![]()
भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा या शासन विभागाच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त स्वावलंबी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना पाणी तपासणीचे प्रात्यक्षिक देण्यात आले. हे प्रात्यक्षिक भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा व जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिले. शालेय विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याच्या तपासणीतील विविध चाचण्यांची ओळख करून देण्यात आली. प्रात्यक्षिकही देण्यात आले. या विशेष कार्यक्रमाच्या प्रसंगी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ भू-वैज्ञानिक संजय कराड, शाळेचे मुख्याध्यापक हरीश शर्मा, सहायक भूवैज्ञानिक राजीव गवई, इंद्रजीत भालेराव यांच्यासह शालेय विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा व जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ५ प्रयोगशाळांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची नियमित पाणी तपासणी केली जाते. या पाणी तपासणीचे प्रात्यक्षिक दाखविण्याच्या हेतूने स्वावलंबी विद्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात तज्ज्ञांनी मुलांसोबत प्रत्यक्ष संवाद साधला. पाण्याबाबतची विविध माहिती दिली. यावेळी कनिष्ठ भू-वैज्ञानिक अक्षय खारवे, प्रणाली सुखदेवे, भूभौतिक माहिती प्रणाली अधिकारी रवींद्र जाधव, आयईसी सल्लागार राजेश डहाके यांच्यासह स्वावलंबी विद्यालयाचे महेश पांडे, मनीष देशपांडे उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यातील घटक, मानवी आरोग्यासाठी विविध घटकांचे प्रमाण, पाणी दूषित असल्यास त्यावरील उपाययोजना आदींबाबत वरिष्ठ भू-वैज्ञानिक संजय कराड यांनी मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक हरीश शर्मा यांनी विद्यार्थ्यांना या वेगळ्या विषयाची माहिती भविष्यात निश्चितच उपयुक्त ठरेल, असा आशावाद व्यक्त केला. यावेळी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या प्रयोगशाळेतील रसायनशास्त्रज्ञ शीला खांडरे व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या पाणी गुणवत्ता सल्लागार ममता गणोदे यांनी विविध रसायनांच्या सहाय्याने पाणी तपासणीचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
Source link
तज्ज्ञांनी दिले पाण्याच्या स्त्रोत तपासणीचे धडे:भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेतर्फे करण्यात आली विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती