![]()
जिल्ह्यात १ ऑगस्टपासून मोटार सायकल चालवताना हेल्मेटचा वापर करणे बंधनकारक करण्यात येणार असून याबाबतचे आदेश पोलिस दलाकडून सोमवारी जारी झाले. सन २०२१ ते २०२५ या दरम्यान विविध अपघातांमध्ये हेल्मेट न वापरल्याने ३३८ जणांचा अपघातात मृत्यू झाला असून ३३२ जण जखमी झाले आहेत. शहरातील अनेक मुख्य रस्ते सिमेंट काँक्रीटचे झाले आहेत. जिल्ह्याला जोडणारे रस्तेही गुळगुळीत झाले आहेत. या रस्त्यांवर अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. बहुता:श अपघात वाहतूक नियमांचे पालन न केल्याने झाले असून मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी अनेक दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातले नव्हते. दरम्यान १ ऑगस्टपासून जिल्ह्यात मोटार सायकल चालवताना हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे. पोलिस अधीक्षकांनी आदेश जारी केला असून, रस्ते अपघातांमध्ये होणारे मृत्यू व गंभीर दुखापती कमी करण्याच्या उद्देशाने मोटारसायकल चालक तसेच मागे बसणाऱ्या प्रवाशांनी हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे, असे आदेशात म्हटले आहे. ८०७ अपघात; ८८३ ठार गत ५ वर्षाचा रस्ते अपघाताबाबतची आकडेवारी पाहता सन २०२१ ते सन २०२५ मध्ये ८०७ प्राणांतिक अपघात झाले असून त्यात ८८३ जणांना मृत्यू झाला. त्यापैकी ३३८ दुचाकी वाहन चालकांनी हेल्मेट परिधान न केल्याने ते मृत्युमुखी पडले. ३३२ चालक गंभीर जखमी झाले होते.
Source link
जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून दुचाकीवर हेल्मेट सक्ती:पोलिस अधीक्षक चांडक यांनी काढले आदेश