Headlines

पेपरफुटी, भरती घोटाळे, परीक्षेतील त्रुटींविरोधात आंदोलन:राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर केले धरणे



नीटसह अन्य पेपरफुटी, भरती घोटाळे व ऑनलाइन परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत शासनाचा निषेध केला. जिल्हाधिकाऱ्यांमार्फ त शासनाला निवेदन पाठवण्यात आले.

.

सातत्याने घडणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटी, शासकीय भरती प्रक्रियेतील कथित गैरव्यवहार, ऑनलाइन परीक्षा व्यवस्थेतील तांत्रिक त्रुटी, पोलिस भरतीतील अनियमितीचा उल्लेख आंदोलनात करण्यात आला. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे व महानगर अध्यक्ष मो. रफीक सिद्दीकी, प्रदेश संघटक सचिव जावेद जकरीया यांनी केले.

वारंवार होणारी पेपरफुटी, परीक्षा रद्द होणे, भरती प्रक्रियेत होणारा विलंब, अपारदर्शक कारभार यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. पेपरफुटी व भरती घोटाळ्यांतील दोषींवर कठोर कारवाई करून भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व विश्वासार्ह करण्याची मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली. शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विद्यार्थी व युवकांच्या न्यायासाठी हा लढा सुरू आहे. शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास राज्यभर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. आंदोलनात विशाल गावंडे, आनंद वानखडे, पंकज गावंडे, परिमल लहाने, दिवाकर गावंडे, करण दौड, अजय पागृत, शिवाजीराव म्हैसने, प्रा. गजानन वाकोडे, श्रेयस चौधरी, विद्या अंभोरे, सुनीता ताथोड, मेघा पाचपोर, कोकिळा वाहूरवाघ, गजानन भटकर आदी होते. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. पेपरफुटी व भरती घोटाळ्यांची निष्पक्ष व कालबद्ध चौकशी करण्यात यावी. एनटीएसह संबंधित संस्थांची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई करावी. ऑनलाइन परीक्षा प्रणालीतील त्रुटी दूर करून पारदर्शक व्यवस्था लागू करावी. पोलिस भरतीसह सर्व शासकीय भरती प्रक्रियेत पात्र उमेदवारांना न्याय द्यावा. महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा व्यवस्था अधिक पारदर्शक व विश्वासार्ह करावी, आदी मागण्या करण्यात आल्या.

नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देण्याची मागणी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *