![]()
पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत असलेल्या ”ऑपरेशन कवच” मोहिमेअंतर्गत तिवसा पोलीस स्टेशन तसेच या.द.व. देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने अमली पदार्थविरोधी प्रतिज्ञा व जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष प्रतिभा गौरखेडे, पोलीस निरीक्षक गोपाल उपाध्याय, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक योगेश देशमुख, छाया दंडाळे, हेमंत निखाडे, संदीप दहाट, संदीप चक्रनारायण यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अमली पदार्थविरोधी प्रतिज्ञाघेत शहरातील प्रमुख मार्गांवरून जनजागृती रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी तसेच जनजागृतीपर फलकांच्या माध्यमातून नागरिकांना अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देत व्यसनमुक्त समाज निर्माण करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे युवकांमध्ये सकारात्मक विचार रुजण्यास मदत होत असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी प्रा.गौरी इंदापवार, पूजा भोयर, वृषाली जगताप, राजकुमार तिडके, भरत गोंजारे, दिवाकर तायडे, अजय मकेश्वर, पवन हेडा तसेच पोलीस अधिकारी अक्षय भागानगरे, अमोल भुरकुल, दिलीप जाधव, पोलीस कर्मचारी अरविंद गावंडे, महेश काळे, सागर डोंगरे, शरद खेडकर, कांचन लोखंडे, दीपाली वानखेडे, प्रदीप मस्के, नंदू जोगदंडे यांच्यासह नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांच्या या जनजागृती रॅलीने परिसरातील नागरीकांचे लक्ष वेधून घेतले होते.
Source link
तिवसा येथे अमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद:ऑपरेशन कवच अंतर्गत व्यसनमुक्त समाज घडवण्याचा दिला संदेश