Headlines

भाजपच्या 'जनरल कायर'ने तरुणांवर लाठीचार्ज केला:दिल्लीत जालियनवाला बाग हत्याकांडाची पुनरावृत्ती, राऊतांचा सरकारवर निशाणा




दिल्लीमध्ये जे आंदोलन सुरू आहे तिथे जमलेले लोकं कोणत्या व्यक्तीच्या मागे तिथे आलेले नाहीत. राहुल गांधी आणि आम्ही सर्वांनी नीट पेपरफुटीचा मु्द्दा उचलून धरला त्यातून ही लढाई सुरू झाली, त्या लढाईत तेल ओतण्याचे काम देशाचे सरन्यायाधीश सुर्यकांत यांनी केले, त्यामुळे हा भडका उडाला आहे. पेपरफुटीचे केंद्र हे महाराष्ट्र आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला पाहिजे, यात आरएसएस लोकं आहेत, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, लोकं बाहेरून आले म्हणून आंदोलन यशस्वी होत नाही, आम्ही सर्व जण आंदोलनाच्या पाठिशी आहोत म्हणून ते आंदोलन होत आहे. पत्रकारांनी सरकारची गुलामगिरी करू नये, असे म्हणत त्यांनी पत्रकारांवर रोष व्यक्त केला. नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी देशातील तरुणांवर हल्ला केला आहे, हे ब्रिटिश काळात जालियनवाला बाग हत्याकांडात दिसले. यांना मुलंबाळ नसल्याने दु:ख कळणार नाही संजय राऊत म्हणाले की, काल दिल्लीमध्ये जो प्रकार झाला त्यानंतर मला जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण झाली. तिथे जनरल डायरने गोळ्या घातल्या इथे भाजपच्या जनरल कायरने तरुणांवर लाठीचार्ज केला, अश्रूधूर सोडला, यामध्ये लहान लहान मुलींचा आक्रोश पाहिला. यांना मुलंबाळ नसल्याने आणि जी आहेत ती परदेशात सुरक्षित असल्याने त्यांना आमच्या भारतामधील मुलांचे आणि त्यांच्या आई-वडीलांचे दु:ख कळणार नाही. कालचा दिवस हा लोकशाहीमधील काळा दिवस होता, यापुढे 20 जुलै हा डरपोक दिवस म्हणून साजरा केला पाहिजे. हा सरकारचा डरपोकपणा संजय राऊत म्हणाले की, पोलिसांनी ज्या पद्धतीने लहान मुलांना मारले त्यांच्यावर हल्ला केला हा सर्व डरपोकपणा आहे. सरकार लहान मुलांना घाबरले आहे त्यांच्याकडून आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. काल आम्ही सर्व जण ग्राऊंडवर होतो, वांगचुक यांची भेट घेतली, मी स्वत: आंदोलकाची भेट घेतली. आजही आम्ही आंदोलकांची भेट घेणार आहे. सुप्रिया सुळे यांची तब्बेत खराब आहे, डॉक्टरांनी त्यांना 10 ते 12 दिवस बोलू नये असे सांगितले आहे. त्यांचे लोकं सुद्धा उपस्थित होते. हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार संजय राऊत म्हणाले की, विरोधी पक्षांनी हे आंदोलन ताब्यात घेतले पाहिजे. आम्ही काल मुंबईमध्ये फार मोठे आंदोलन केले अजूनही करत आहोत आणि करत राहू.आदित्य ठाकरे हे तरुणांना एकत्र करत या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. देशपातळीवर हे आंदोलन घेऊन जावे लागेल. धर्मेंद्र प्रधान हे निर्लज्ज आहेत ते आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहेत. एकीकडे आंदोलकांवर लाठीचार्ज सुरू असताना हे लोकं हसत हसत संसद भवन परिसरातून बाहेर पडतात हे क्रौर आहे ते डरपोक पणातून निर्माण होते. शेतकऱ्यांना शंभू बॉर्डरवर रोखले संजय राऊत म्हणाले की, काल हजारो शेतकरी शंभू बॉर्डरवर जमा झाले होते त्यांना विद्यार्थ्यांच्या या आंदोलनात सहभागी व्हायचे होते. पण तिथे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आणि पंजाब, हरियाणामधील शेतकऱ्यांना अडवण्यात आले. नाहीतर ते सुद्धा यामध्ये सहभागी होणार होते. नीट विरोधात सर्वांत पहिले आंदोलन राहुल गांधी यांनी केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *