![]()
दिल्लीतील नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. सोशल मीडियावरील पोस्टद्वारे त्यांनी विद्यार्थ्यांवरील लाठीमार, अश्रुधूराचा वापर आणि आंदोलकांशी झालेल्या कथित गैरवर्तनाचा तीव्र निषेध करत सरकारवर गंभीर आरोप केले. ‘ही लोकशाही की दडपशाही?’ आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून सरकारवर संताप व्यक्त करताना अमित ठाकरे म्हणाले की, “२० हून अधिक विद्यार्थ्यांचा जीव घेणाऱ्या शिक्षण व्यवस्थेविरोधात शांततेत प्रश्न विचारणाऱ्या मुलांवर तुम्ही लाठ्या चालवल्यात? बंदुका दाखवून त्यांना अडवलंत? १५-१५ वर्षांच्या मुलांची डोकी फोडली? अश्रूधूर सोडला? सत्तेची ही कसली मस्ती आलीये सरकारला? देशात लोकशाही उरलीये की निव्वळ दडपशाही सुरू आहे?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. ‘राजीनामा मागणं गुन्हा आहे का?’ शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सुरू असलेल्या आंदोलनावर पोलिसांकडून झालेल्या बळाच्या वापरावर अमित ठाकरे यांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले. “विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागणं हा गुन्हा आहे का? त्यासाठी शांतपणे रस्त्यावर उतरलेल्या महिला आंदोलकांवर काल पुरुष पोलीस अधिकाऱ्यांनी लाठ्या चालवल्या. नाव आणि बॅज नंबर नसलेले जवान आणून तरुणांना अगदी तुडवलं गेलं. सोनम वांगचुक यांच्या पत्नीशी गैरवर्तन केलं गेलं. ही कसली गुंडगिरी सुरू आहे?” असा जाब त्यांनी विचारला. ‘दलाल मोकाट, विद्यार्थ्यांवर सत्तेचा माज’ पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईची तुलना करताना ते म्हणाले, “पेपर फोडून विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे दलाल तुमच्या राज्यात मोकाट फिरतात, आणि हक्कासाठी लढणाऱ्या या देशाच्या तरुणाला काल तुम्ही बेशुद्ध होईपर्यंत मारलंत? तुमच्याकडे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरं नाहीत म्हणून पोलिसांच्या मागे लपून मुलांची डोके फोडताय? सत्तेचा हा कसला माज?” ‘स्वतःचे अपयश लपवण्याचा प्रयत्न’ स्वतःच्या अपयशाची जबाबदारी घेण्याची हिंमत या सरकारमध्ये उरलेली नाही, म्हणूनच असा अमानुष पोलीस बळाचा वापर केला गेल्याचा थेट आरोप अमित ठाकरे यांनी केला. “लोकांच्या मतांवर निवडून आलेलं सरकार असं चालत नसतं. खरंच…लाजा वाटल्या पाहिजेत या सरकारला!” अशा अत्यंत आक्रमक शब्दांत त्यांनी सरकारचा निषेध नोंदवला आहे. हेही वाचा.. CJPचे जंतर-मंतरवर पुन्हा आंदोलन सुरू: समर्थकांनी रात्रीतून पुन्हा स्टेज उभा केला; अभिजीत दीपके म्हणाले- आज पुन्हा संसद मार्च कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच CJP चे जंतर-मंतरवर पुन्हा आंदोलन सुरू झाले आहे. CJP च्या संसद मार्चनंतर दिल्ली पोलिसांनी सोमवारी संध्याकाळी 5 वाजता जंतर-मंतर रिकामे केले होते. पण, आंदोलक आणि अभिजीत दीपके 6 तासांनंतर पुन्हा परतले. सोमवारी रात्री 11 वाजेपर्यंत मोठ्या संख्येने लोक जमा झाले आणि त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. दीपके यांनी इंडिया टुडेसोबत खास बातचीतमध्ये सांगितले की, ते मंगळवारीही संसद मार्च करणार आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहील. आम्ही जंतर-मंतरवरून हटणार नाहीत. सविस्तर वाचा अश्विनी भिडेंचा इगो मोदींपेक्षा जास्त- देशपांडे:साकीनाका, चेंबूर दुर्घटनेवरून मनसे आक्रमक; दोषींवर कारवाईसाठी उद्या मुंबईत आंदोलन दिल्लीतील नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलिस लाठीमाराचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र निषेध केला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हा लाठीमार जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण करून देणारा असल्याचा आरोप करत केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांवर जोरदार टीका केली. तसेच मुंबईतील चेंबूर दुर्घटनेतील जबाबदारांवर कारवाईच्या मागणीसाठी आज सकाळी ११ वाजता आझाद मैदानावर मनसे आंदोलन करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. सविस्तर वाचा
Source link
शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागणं गुन्हा आहे का?:देशात लोकशाही उरलीये की दडपशाही?- अमित ठाकरे आक्रमक