![]()
बहीण-भावाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना सिल्लोड तालुक्यातील एका गावात उघडकीस आली आहे. एका नराधम चुलत भावाने आपल्याच अल्पवयीन चुलत बहिणीवर अत्याचार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने सुमारे चार ते पाच महिन्यांपूर्वी मुलीला शेतात नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर प्रथम अत्याचार केला. त्यानंतर या कृत्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. या सततच्या शोषणामुळे अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी आरोपीविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह (पोक्सो) विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, पोलिस उपनिरीक्षक बनकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान, सिल्लोड परिसर अशा गंभीर आणि धक्कादायक घटनांनी वारंवार हादरत असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वीच, जुन्या भांडणाच्या खटल्यात साक्ष देण्यासाठी सिल्लोड न्यायालयात आलेल्या एका विवाहितेला तिच्याच पतीने न्यायालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची भीषण घटना घडली होती. या घटनांमुळे स्थानिक महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कन्नडमध्ये 5 लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ शेतीकामासाठी माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये, या मागणीसाठी आलिशा शाहरुख पटेल (रा. कुंजखेडा) हिचा छळ केल्याप्रकरणी कन्नड ग्रामीण पोलिसांत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आलिशा यांच्या फिर्यादीवरून पती शाहरुख पटेल, शाहेजान पटेल, नजीम पटेल, अर्शद पटेल आणि फय्याज महंमद (सर्व रा. कुंजखेडा) यांनीपैशांची मागणी करत त्रास दिला. या प्रकरणी पोलिसांनी पाचही आरोपींविरुद्ध भादंवि कलम 498 अ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. सहायक पोलिस निरीक्षक नारायण गीते यांच्या मार्गदर्शनाखालीजमादार शिवदास बोराडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Source link
नात्याला काळीमा:फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन चुलत बहिणीवर वारंवार अत्याचार, मुलगी गर्भवती राहिल्यानंतर सिल्लोड पोलिसात गुन्हा दाखल