![]()
दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस लाठीचार्जच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदच्या हाकेला राहुरी तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वंचितचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव व जिल्हा संपर्कप्रमुख पिंटू साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी शहरात व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने शंभर टक्के बंद पाळत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. वंचित बहुजन आघाडी तसेच विविध सामाजिक संघटनांच्यावतीने सकाळी रॅलीची सुरुवात करण्यात आली. कार्यकर्त्यांनी मोटारसायकल रॅलीद्वारे राहुरी शहरातून फेरी काढली. शहरातील शनी चौक येथील संविधान स्तंभाला अभिवादन करून सभा घेण्यात आली. यावेळी विविध वक्त्यांनी दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचा तीव्र निषेध व्यक्त केला.
Source link
बंद:विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ राहुरी कडकडीत बंद