Headlines

माझ्या लेकराच्या कष्टाचे चीज झाले:शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर अभिजित दीपके यांच्या आईची भावनिक प्रतिक्रिया; 36 दिवसांच्या लढ्याला अखेर यश




गेल्या ३६ दिवसांपासून जंतर-मंतरवर सुरू असलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजित दीपके यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनीही भावना व्यक्त केल्या. विशेषतः अभिजित दीपके यांच्या आई अनिता दीपके यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्या मुलाच्या संघर्षाचे कौतुक करत आनंद व्यक्त केला. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या लढ्याला अखेर यश मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. “माझ्या लेकराच्या कष्टाचे चीज झाले,” अशा शब्दांत अभिजित दीपके यांच्या आईने आपल्या भावना मांडल्या. त्या म्हणाल्या की, गेल्या अडीच महिन्यांपासून संपूर्ण कुटुंब मोठ्या तणावाखाली होते. अभिजित यांना रात्रीची झोप लागत नव्हती. त्यांच्यासोबतच घरातील इतर सदस्यही चिंतेत होते. दिवस-रात्र आंदोलनाची चिंता आणि त्यासाठी सुरू असलेली धडपड यामुळे संपूर्ण कुटुंब मानसिक तणावातून जात होते. मात्र, आज त्यांच्या मुलाच्या कष्टाला योग्य फळ मिळाल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या मुलाने घेतलेल्या भूमिकेवर आणि केलेल्या संघर्षावर त्यांना अभिमान असल्याचेही त्यांनी नमूद केले. ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या वतीने जंतर-मंतर येथे गेल्या 36 दिवसांपासून सातत्याने आंदोलन सुरू होते. विविध मागण्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या या आंदोलनाने देशभराचे लक्ष वेधून घेतले होते. आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांसाठी ठाम भूमिका घेतली होती. अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर या आंदोलनाला मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे. राजीनाम्याच्या घोषणेनंतर जंतर-मंतर परिसरात आंदोलनकर्त्यांनी आनंद व्यक्त करत एकमेकांचे अभिनंदन केले. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अभिजित दीपके यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. जंतर-मंतर येथे उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी, “या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत, असे म्हटले जायचे. पण झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए,” असे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. गेल्या 36 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या प्रयत्नांमुळे हा विजय मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. संघर्षाला संयम, सातत्य आणि ठाम भूमिका यांची जोड मिळाल्यास यश मिळते, हे या आंदोलनाने पुन्हा एकदा दाखवून दिल्याचे त्यांनी नमूद केले. धडपड, चिंता आणि संघर्ष यांचे समाधानात रूपांतर दरम्यान, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर अभिजित दीपके यांच्या कुटुंबीयांसह ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अनेक दिवसांच्या संघर्षानंतर मिळालेल्या या यशामुळे आंदोलनकर्त्यांचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे. आपल्या मुलाने घेतलेल्या भूमिकेमुळे आणि केलेल्या अथक परिश्रमांमुळे आजचा दिवस समाधानाचा असल्याचे अभिजित दीपके यांच्या आईने सांगितले. गेल्या अडीच महिन्यांपासून सुरू असलेली धडपड, चिंता आणि संघर्ष यांचे आज समाधानात रूपांतर झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *