![]()
बारामती तालुक्यातील सुपे-चौफुला मार्गावर रविवारी दुपारी एका मालवाहतूक ट्रक आणि दुचाकीचा अत्यंत भीषण अपघात झाला. या अपघातात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. ही संपूर्ण थरारक घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, एकाच घरातील दोन तरुण मुलांचा बळी गेल्याने संपूर्ण बारामती तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी हे दोन्ही भाऊ आपल्या दुचाकीवरून शेंडगेवाडी येथील आपल्या घराकडे निघाले होते. सुपे-चौफुला मार्गावरील अहिल्यादेवी चौकातून वळण घेत असताना अचानक त्यांची दुचाकी स्लिप होऊन घसरली. दुर्दैवाने, त्याच वेळी मोरगावच्या दिशेने जाणारा एक मालवाहतूक ट्रक तेथून जात होता. दुचाकी घसरल्याने दोन्ही भाऊ रस्त्यावर पडले आणि थेट ट्रकच्या मागील चाकाखाली आले. सोमनाथ दत्तात्रय ठोंबरे आणि शुभम दत्तात्रय ठोंबरे अशी या अपघातात प्राण गमावलेल्या सख्ख्या भावांची नावे आहेत. या भीषण घटनेत सोमनाथ ठोंबरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर, गंभीर जखमी झालेल्या शुभम ठोंबरे याला नागरिकांनी तात्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, दुखापत गंभीर असल्याने उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यालाही मृत घोषित केले. घराकडे निघालेल्या दोन सख्ख्या भावांवर काळाने असा अचानक घाला घातल्याने शेंडगेवाडी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची नोंद पोलिसांत करण्यात आली असून, सुपे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे या अपघाताचा पुढील तपास करत आहेत. हे ही वृत्त वाचा नाशिकच्या सिन्नरमध्ये भीषण अपघात- VIDEO:उड्डाणपुलावरून ट्रक थेट खाली कोसळला; थरार कॅमेऱ्यात कैद
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर एमआयडीसी परिसरात एक अत्यंत भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात असलेल्या एका ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक उड्डाणपुलावरून थेट खाली कोसळला. या घटनेचा संपूर्ण थरार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पुलावरून थेट ट्रक खाली पडल्याने परिसरात काही काळ मोठी खळबळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वाचा सविस्तर चालकाचा ताबा सुटला अन् ट्रक खाली कोसळला मिळालेल्या माहितीनुसार, सिन्नर एमआयडीसी परिसरातील उड्डाणपुलावरून हा ट्रक जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. भरधाव वेगात असलेल्या ट्रकवरून चालकाचे अचानक नियंत्रण सुटले. ताबा सुटलेला हा अवजड ट्रक पुलाच्या कठड्यांना धडकून थेट पुलावरून खाली जमिनीवर जाऊन आदळला. अपघात इतका भीषण होता की ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.वाचा सविस्तर
Source link