Headlines

चांदवडला बाजारतळ गाळ्यांचा लिलाव रद्द करा:विस्थापितांचे नाममात्र भाडेतत्त्वावर पुनर्वसन करावे; श्रमशक्ती हॉकर्स सेलचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन‎



शहरातील बाजारतळात नव्याने बांधण्यात आलेल्या गाळ्यांचा ऑनलाईन लिलाव रद्द करून ते पात्र हॉकर्सना प्राधान्याने नाममात्र भाडेतत्त्वावर वाटप करावेत, तसेच विस्थापित टपरीधारकांचे तातडीने पुनर्वसन करावे, अशी मागणी श्रमशक्ती कामगार संघटना प्रणीत श्रमशक्ती हॉक

.

२८ फेब्रुवारी २०२५ रोजी चांदवड नगरपरिषदेने बाजारतळ परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविली होती. या कारवाईपूर्वी सर्व नोंदणीकृत हॉकर्स व टपरीधारकांनी ‘प्रथम पर्यायी पुनर्वसन करावे, मगच अतिक्रमण हटवावे,’ अशी मागणी केली होती. त्यावेळी तत्कालीन मुख्याधिकारी दिनेश सिनारे यांनी विश्रामगृह येथे बैठक घेऊन बाजारतळावर पक्के गाळे बांधून सर्व पात्र हॉकर्सचे पुनर्वसन केले जाईल, असे आश्वासन दिल्याने हॉकर्सनी प्रशासनाला सहकार्य केले होते.

मात्र, प्रत्यक्षात बाजारतळातील केवळ ६० ते ७० गरीब हॉकर्स व टपरीधारकांचे उपजीविकेचे साधन उध्वस्त करण्यात आले. बाजारतळात नव्याने पक्के पेटी शॉप (गाळे) उभारण्यात आले असले, तरी विस्थापित हॉकर्सचे पुनर्वसन करण्याऐवजी त्या गाळ्यांचा ऑनलाइन लिलाव करण्याचे नियोजन नगरपरिषद करीत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. गाळ्यांचा लिलाव तातडीने स्थगित करून ते नाममात्र भाडेतत्त्वावर पात्र व विस्थापित हॉकर्सना वाटप करावेत आणि कायद्यानुसार त्यांचे तातडीने पुनर्वसन करावे, अशी मागणी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष वसंत ठाकूर, चांदवड शहर पथविक्रेता समितीचे सदस्य दीपक शिरसाट, भरत बिल्लाडे, प्रदीप बडोदे, संतोष पैलमाले आदींनी केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *