Headlines

जायखेडा विद्यालयामध्ये ईव्हीएमवर शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक:अधिकृत निकालातून विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव‎




लोकशाहीची मूल्ये विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्याच्या उद्देशाने येथील कृष्णाजी माऊली जनता इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक पार पडली. मतदान केंद्र, मतदार यादी, ईव्हीएमद्वारे मतदान, मोबाईल ॲपचा वापर, मतमोजणीच्या फेऱ्या आणि अधिकृत निकाल घोषणेमुळे विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. मुख्य निवडणूक अधिकारी व्ही. पी. शेवाळे आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी डी. बी. अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडली. यंदा प्रथमच मोबाईल ॲप आणि ईव्हीएमच्या माध्यमातून मतदान घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला. शालेय पंतप्रधान पदासाठी सहा उमेदवार रिंगणात होते. मतदानानंतर ईव्हीएमद्वारे तातडीने मतमोजणी करण्यात आली. प्रत्येक फेरीतील निकाल आर. जे. म्हसदे यांनी जाहीर केल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. विद्यार्थीनी साक्षी शेवाळे शालेय पंतप्रधानपदी विजयी ठरली, तर स्नेहल अहिरे हिची उपपंतप्रधानपदी अविरोध निवड झाली. निकाल जाहीर होताच विद्यालय परिसरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. माध्यमिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष अनिल दादा बोरसे आणि संतोष बापू अहिरे यांनी उपक्रमाचे कौतुक केले.मुख्याध्यापक व्ही. पी. शेवाळे यांनी लोकशाही प्रक्रियेची माहिती देत विद्यार्थ्यांनी मतदानाचा अधिकार आणि जबाबदारी समजून घ्यावी, असे आवाहन केले.निवडणूक यशस्वी करण्यासाठी एस. ए. गावित, एन. के. शेवाळे, जे. बी. पवार, नेरकर, आर. पी. भोये आदींनी यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *