Headlines

गोपाळपूर येथे 2 टन कचरा संकलित:स्वच्छ वारी, निर्मल वारी, हरित वारी अभियान ठरले यशस्वी‎




पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या निर्देशानुसार आणि ‘स्वेरी’चे संस्थापक व प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (स्वेरी) पंढरपूरच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत दि. २२ जुलै रोजी गोपाळपूर येथे ‘स्वच्छ वारी, निर्मल वारी, हरित वारी’ हे स्वच्छता अभियान उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर गोपाळपूर ते रिद्धी-सिद्धी गणेश मंदिर परिसर या मार्गावर व्यापक स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या अभियानादरम्यान स्वयंसेवकांनी सुमारे १.५ ते २ टन कचरा संकलित करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली. या प्रसंगी गोपाळपूरचे ज्येष्ठ नागरिक दिलीप गुरव यांनी उपस्थितांना स्वच्छता, सामाजिक जबाबदारी आणि पर्यावरण संवर्धन या विषयांवर प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तसेच विद्यापीठाचे पंढरपूर विभागीय समन्वयक डॉ. संजय मुजमुले यांनी स्वयंसेवकांना समाजसेवेचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एम. एम. पवार आणि डॉ. नीता तळवलकर यांनी केले. प्रशासक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांची उपस्थिती या उपक्रमास गोपाळपूरचे ज्येष्ठ नागरिक पांडुरंग देवमारे, ग्रामपंचायत प्रशासक साईनाथ अडगटाळे, महसूल अधिकारी, विलास मस्के, उदय पवार, अरुण बनसोडे, राजेंद्र बनसोडे, सचिन आसबे सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, नागरिक आणि राष्ट्रीय सेवा योजनाचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *