Headlines

पोलिसांची गाडी अडवणारी रियाची पोलिसांकडे धाव:सोशल मीडियावर ट्रोल; पोलिसांकडे तक्रार




गेल्या आठवड्यात मुंबईत विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांची गाडी अडवताना दिसलेली मॉडेल रिया अहिर हिने ऑनलाइन छळाची तक्रार करत पोलिसांत धाव घेतली आहे. आपल्या या कृतीसाठी सोशल मीडियावर आपल्याला ट्रोल केले जात असल्याचे तिने म्हटले आहे. २२ जुलै रोजी दादरच्या शिवाजी पार्क येथे पावसात झालेल्या आंदोलनातील एका व्हायरल फोटो व्हिडिओमध्ये ताब्यात घेतलेल्या तरुण आंदोलकांना नेणाऱ्या पोलिसांच्या गाडीसमोर रिया अहिर उभी असल्याचे दिसले होते. राखाडी रंगाचा हुडी घालून पोलिसांची गाडी अडवण्यासाठी ठामपणे उभ्या असलेल्या अहिरचा हा फोटो मुंबईतील आंदोलनातील सर्वात लक्षवेधी फोटोंपैकी एक ठरला होता. पोलिसांची गाडी अडवतानाचा तिचा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर डीप-फेक व्हिडिओ आणि शिवीगाळीचे लक्ष्य बनवले गेल्याचा दावा अहिरने सायबर पोलिसांत दिलेल्या तक्रारीत केला आहे. बदनामी, छेडछाड केलेले फोटो, महिलांचा अवमान करणारी शिवीगाळ, धमकी आणि हेतुपुरस्सर छळ करणारी एक सुनियोजित ऑनलाइन द्वेष मोहीम चालवली गेल्याचा आरोप अहिरने केला आहे. दरम्यान, एखाद्या महिलेचे मॉर्फ केलेले फोटो किंवा डीप-फेक व्हिडिओ सोशल मीडियावर पसरवणे हा माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गंभीर गुन्हा असतो. स्क्रीनशॉट्स, यूआरएलचे पुरावे केले सादर आंदोलनाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक सोशल मीडिया अकाउंट्सवरून तिच्याविरोधात पद्धतशीरपणे अपमानास्पद आणि बदनामीकारक मजकूर पसरवण्यात आल्याचा आरोप करत तिने स्क्रीनशॉट्स, यूआरएल आणि इतर डिजिटल पुरावे पोलिसांना सादर केले आहेत. गाडीत महिलांसह अनेक आंदोलकांना पाहिल्यानंतर आपल्याला काळजी वाटल्याचे तिने सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *