Headlines

संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयाला स्वायत्ततेची शक्यता- डाॅ. सापळे:अहिल्यानगर, वर्धा, पालघरला नवीन वैद्यकीय महाविद्यालये




राज्यात सध्या प्रत्येक जिल्ह्यात किमान एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे शासनाचे धोरण आहे. या धोरणांतर्गत आगामी काळात वर्धा, पालघर आणि अहिल्यानगर येथे आणखी ३ नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत. तसेच राज्यभरात पदव्युत्तर (पीजी) वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तब्बल १४७० जागा वाढवण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली. येथील घाटी महाविद्यालयातील आढावा बैठकीनंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. मराठवाडा दौऱ्यावर असताना डॉ. सापळे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील महाविद्यालयाला भेट दिली. या वेळी येथील ‘अतिविशेषोपचार रुग्णालय’ (सुपरस्पेशालिटी) शंभर टक्के कार्यान्वित झाल्याबद्दल त्यांनी प्रशासनाचे विशेष कौतुक केले. बैठकीला अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. अहिल्यानगर वैद्यकीय महाविद्यालयाची राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची पहिली तपासणी पूर्ण झाली असूनदुसऱ्या तपासणीनंतर हे महाविद्यालय प्रत्यक्ष सुरू होईल, अशी माहिती त्यांनी दिली. घाटीला स्वायत्ततेची शक्यता राज्यात ३ मेडिकल कॉलेजला स्वायत्ततेचा दर्जा देण्यात येणार आहे. माजी मुख्य सचिवांच्या अहवालानुसार मुंबईतील जे.जे., पुण्यातील बी.जे. आणि नागपूर वैद्यकीय महाविद्यालयाला स्वायत्तता मिळेल. यात चौथे स्वायत्त मेडिकल कॉलेज म्हणून छत्रपती संभाजीनगरच्या घाटीचाही समावेश केला जाऊ शकतो, असे डॉ. सापळे यांनी स्पष्ट केले. राज्यात १ हजार खाटा वाढणार नव्या मेडिकल कॉलेजसाठी मुख्यमंत्र्यांच्या ‘वॉर रूम’मधून थेट आढावा घेतला जात आहे. एका कॉलेजसाठी किमान ३०० खाटांची आवश्यकता असते. त्यामुळे या ३ नवीन महाविद्यालयांमुळे राज्याच्या आरोग्य व्यवस्थेत किमान १ हजार खाटांची भर पडणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *