Headlines

गुरुपौर्णिमेनिमित्त श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात जय्यत तयारी:भाविकांच्या गर्दीचे चोख नियोजन, अन्नछत्र मंडळातर्फे महाप्रसादाची सोय




श्री गुरुपौर्णिमा निमित्त येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरासह समाधी मठ व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने जय्यत तयारी केली आहे. भक्तनिवास, यात्री निवासाचे बुकिंग फुल्ल झाले असल्याचे व्यवस्थापनाने कळवले आहे. स्वामी समर्थांचे मंदिरात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन बुधवारी पहाटे 2 वाजता मंदिर भाविकांसाठी खुले केले करण्यात आले आहे. नित्यनियमाने होणारे अभिषेक होणार नाहीत. महिला व पुरुषांची स्वतंत्र रांग करण्यात आली आहे. अन्नछत्र मंडळाने बुधवारी सकाळी 11.30 ते रात्री 11.30 वाजेपर्यंत प्रसादाची व्यवस्था केली आहे. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान येथे बुधवारी मंदिरात नित्य नियमाने होणारी काकड आरती पहाटे 4 वाजता पार पडली. गर्दी लक्षात घेऊन मंदिर बुधवारी पहाटे 2 वाजता उघडण्यात येईल. या दिवशी स्वामी भक्तांचे नित्यनियमाने होणारे अभिषेक झाले नाहीत. सकाळी 11 वाजता नैवेद्य आरती झाली. रात्री 7:50 ते रात्री 8:30 या वेळेत श्रींची शेजारती संपन्न होईल. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता महिला व पुरुष भक्तांची स्वतंत्र दर्शन रांग, पोलिस बंदोबस्त, बॅरेकेटींग दर्शन रांग, दर्शन रांगेत पिण्याच्या पाण्याची सोय, प्रथमोपचार केंद्र, वैद्यकीय सेवा, व्हीलचेअर इत्यादी सुविधांची तयारी केल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली. अन्नछत्र मंडळासह समाधी मठाची गुरुपौर्णिमा उत्सवाची तयारी उत्साहात अन्नछत्रची बारा तास प्रसादाची सोय येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ वर्धापन दिन आणि गुरुपौर्णिमा निमित्त बुधवारी सकाळी 11.30 ते रात्री 11.30 वाजेपर्यंत प्रसाद सेवा चालू राहील. सकाळी 7 ते 9 पर्यंत महाप्रसाद गृह येथे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण पार पडले. सकाळी 9 ते 10 पर्यंत नामस्मरण, जप व श्री गुरूपूजा झाली. सकाळी 10 वा. मान्यवरांच्या हस्ते श्रींची महाआरती व महानैवेद्य दाखविण्यात आला. केंद्रीय नागरी उड्डाण राज्य मंत्री मुरलीधर मोहळ, पालकमंत्री जयकुमार गोरे, मंत्री भरत गोगावले, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे आदी उपस्थित होते. अन्नछत्र येथे नयनरम्य विद्युत रोषणाई श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या कुशल नेतृत्वामुळे राज्यासह भारत देशातच नव्हे तर परदेशात श्रीक्षेत्र अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांचा महाप्रसाद म्हणून श्री भक्तांतून ओळख असलेल्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा 39 वा. वर्धापन दिन आणि श्री गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या निमित्ताने महाप्रसादालय, परिसरातील विविध मंदिर, शिवस्मारक, यात्री निवास, यात्री भुवन आदी ठिकाणी नयनरम्य विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. वाहन पार्किंगची सुसज्ज सोय, तात्पुरत्या कंट्रोल रुमची तयारी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ पार्किंग, श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल, ख्वाजा नुरद्दीन बाबा दर्गा मैदान, थडगे मळा परिसर, श्री मालोजीराजे भोसले यांचे मालकी जागेवर, मंगरूळ चौक ते स्वामी समर्थ मंदिर जाणाऱ्या नव्याने बांधण्यात येत असणाऱ्या रोडवर, श्री मल्लिकार्जुन मंदिर परिसर या ठिकाणी बाहेरून येणाऱ्या भाविकांच्या वाहनांचे पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे. तात्पुरत्या कंट्रोल रूमची निर्मिती करण्यात येणार आहे. अन्नछत्र मंडळाचे यात्री निवास फुल्ल अन्नछत्र मंडळाच्या यात्री निवासात मिनी हॉलसह कॉमन 66 खोल्या असून 14 मोठे हॉल आहेत. पैकी दहा हॉलमध्ये बेडची व्यवस्था केली आहे. या इमारतीमध्ये सुमारे 2000 भक्त निवासाला थांबू शकतील इतकी क्षमता आहे. यात्री भुवन या इमारतीत नॉन एसी सुट आणि एसी सुट तसेच डिलक्स एसी सुट आहेत. येथे सुमारे 500 भक्त निवास करू शकतील इतकी क्षमता आहे. हे सर्व फुल्ल झाले आहेत. पालखी व रथयात्रेचा शुभारंभ बुधवार सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सर्व स्वामी भक्तांना महाप्रसाद, सायं 4 वाजता श्री स्वामी समर्थांच्या पादुका पालखी, आणि न्यासाच्या सुशोभित केलेल्या रथाच्या भव्य मिरवणुकीचा दिंड्या व वाद्यांचा गजरात आणि ‘नांदब्रम्ह’ पुणे व आराध्या चुनाभट्टी, मुंबई या ढोल पथकाच्या तालात आणि अमोलराजे लेझीम संघाच्या शानदार खेळाने पालखी व रथयात्रेचा शुभारंभ होईल. देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, ज्येष्ठ विधिज्ञ नितीन हबीब, महेश गावसकर यांचे विशेष सहकार्य आहे. अक्कलकोटनगरीत गुरुपौर्णिमा उत्सवासाठी येणार दीड लाखावर भाविक अक्कलकोट गुरुपौर्णिमेच्या उत्सवासाठी अक्कलकोट नगरी भक्तिरसात न्हाऊन निघण्यासाठी सज्ज झाली आहे. येथील प्रसिद्ध श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर, समाधी मठ आणि श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा वर्धापन दिन व गुरुपौर्णिमा उत्सवासाठी दीड लाखांवर भाविकांची मांदियाळी जमणार आहे. गुरूपौर्णिमेच्या पूर्वसंध्येलाच शहरांमधील सर्व भक्तनिवास व यात्रीनिवास फुल्ल झाले असून, प्रशासनाने आणि देवस्थान समितीने गर्दीचे नियोजन करण्यासाठी चोख व्यवस्था केली आहे. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गर्दी लक्षात घेता श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर पहाटे 2 वाजताच उघडण्यात आला आहे. काकड आरती नेहमीप्रमाणे पहाटे 4:00 वाजता झाली. वाढती गर्दी पाहता या दिवशी स्वामी भक्तांचे नित्यनियमाने होणारे वैयक्तिक अभिषेक बंद असणार आहेत. सकाळी 11:00 वाजता संपन्न होईल. रात्री 7:50 ते 8:30 या वेळेत होईल. पहाटे दोन वाजता मंदिर उघडले श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ धार्मिक कार्यक्रम व क्रिकेट अकॅडमीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त आणि गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू झाली आहे. सकाळी 7:00 ते 9:00 या काळात महाप्रसाद गृह येथे ”श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत” ग्रंथाचे सामूहिक पारायण झाले. सकाळी 9 ते 10 नामस्मरण, जप व श्री गुरूपूजा, सकाळी 10 वाजता विविध मान्यवरांच्या हस्ते श्रींची महाआरती व महानैवेद्य. धार्मिक विधींनंतर दुपारी 12:30 वाजता मंडळाच्या नवीन वाहनतळ जागेत श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट संचलित ”अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले क्रिकेट ट्रेनिंग अकॅडमी”चा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पालकमंत्री जयकुमार गोरे, मंत्री भरतशेठ गोगावले, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार शेखर निकम, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे उपस्थित राहतील. कार्यक्रमाला भारताचे माजी क्रिकेटपटू व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक चंद्रकांत पंडित, माजी भारतीय क्रिकेटपटू समीर दिघे, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे रणजी सिलेक्टर संजय पाटील, सिंग्स स्पोर्ट्सचे धर्मराज गोपाल सिंग व जेष्ठ विधीज्ञ अॅड. नितीन हबीब. या सोहळ्यास सी.ए. महेश गावस्कर (पुणे), अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष व विश्वस्त जनार्दन (अण्णा) थोरात, सचिन सांबरेकर (पालखी परिक्रमा संयोजक, बेळगावी) आणि ललिताताई वीर (नाशिक) यांच्यासह अनेक देणगीदार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिराचे चेअरमन महेश इंगळे म्हणाले, “वाहतूक नियोजन, वैद्यकीय सेवाही उपलब्ध “भाविकांच्या सोयीसाठी महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शन रांगा, दर्शन मंडप, बॅरिकेटींग, पिण्याच्या पाण्याची सोय, प्रथमोपचार केंद्र, वैद्यकीय सेवा, व्हीलचेअर तसेच कडक पोलिस व वाहतूक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *