Headlines

सिल्लोडमधील रस्त्यावर तरुणाचा ‎गळा चिरलेला मृतदेह आढळला:कारण अस्पष्ट, अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल‎




शहरातील भोकरदन रोडवरील एकता‎पेट्रोल पंपाच्या पाठीमागील‎नगरपरिषदेच्या पाणीटाकीजवळ‎बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास‎एका ३० ते ३५ वर्षीय अज्ञात तरुणाचा‎गळा शस्त्राने चिरून खून केल्याची‎घटना उघडकीस आली आहे.मृताची‎ओळख अद्याप पटलेली नाही.‎ मृतदेह कुजलेल्या अवस्थेत‎आढळून आल्याने, खुनानंतर पुरावे‎नष्ट करण्याच्या उद्देशाने तो या निर्जन‎स्थळी फेकून दिल्याचा संशय व्यक्त‎होत आहे. डायल ११२ वर मिळालेल्या‎माहितीवरून पोलिस कर्मचारी‎सलीमपाशा चांदपाशा मोमीन यांनी‎तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेथे‎मृताच्या डाव्या डोळ्याजवळ गंभीर‎दुखापत असून गळा चिरलेल्या‎स्थितीत मृतदेह आढळला. पोलिसांनी‎दिलेल्या तक्रारीवरून सिल्लोड शहर‎पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध‎गुन्ह्याची नोंद केली आहे. पोलिस‎निरीक्षक शामसुंदर कौठाळे,‎सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद‎भिंगारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस‎निरीक्षक विजयसिंग राजपूत,‎फौजदार धम्मदीप काकडे व अनंत‎जोशी यांनी फॉरेन्सिक पथकासह‎घटनास्थळी भेट दिली. पथकाने तेथून‎रक्त आणि मातीचे नमुने जप्त केले.‎मृतदेहाचा पंचनामा करून तो‎शवविच्छेदनासाठी पाठवला असून‎फिंगरप्रिंट तज्ज्ञांकडूनही गुन्ह्याचा‎तपास सुरू आहे.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *