![]()
विद्यार्थ्यांमध्ये गणिताची भीती दूर करून त्यांना झटपट व अचूक गणित सोडविण्याची क्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने इन्स्पायर अबॅकस अँड वेदिक मॅथ अकॅडमी आयोजित राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धा उत्साहात पार पडली. सुखकर्ता लॉन येथे झालेल्या या स्पर्धेत राज्यासह देशभरातील ८७७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अकॅडमीच्या संचालिका अर्चना शेळके, सत्यशिला भद्रे आणि दादासाहेब शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठमोठी गणिते अवघ्या पाच मिनिटांच्या आत अचूक सोडवून उपस्थितांची दाद मिळवली. विद्यार्थ्यांच्या वेगवान गणनकौशल्याने पालक व उपस्थित मान्यवर प्रभावित झाले. यावेळी महापौर ज्योती गाडे उपस्थिती होत्या. राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या आराध्या भाग्यवंत, राजवीर परदेशी, श्रावणी काळे, एस. हासीनी आणि साहिल मिंड या यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पूजा पाटील, अनुष्का सोनवणे, वेदिका सायंबर, रिद्धी कासार, स्नेहल परकाळे, शिवतेज जाधव, स्वरा खंडागळे, जोया हवालदार, ऐश्वर्या सायंबर, पूर्वा बेदरे, सार्थक गोरे, शिवश्री व्यवहारे, शिवांश खंदारे, शौर्य जाधव, शिवतेज धराडे, आराध्या भाग्यवंत, प्रेरणा वाबळे, सोहम खंडागळे, नियती भागवत या विद्यार्थ्यांना चॅम्पियन ट्रॉफी प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी अकॅडमीतील उत्कृष्ट कार्याबद्दल सोमनाथ बोचरे यांना स्टार टीचर अवॉर्ड, तर प्रतिक्षा बर्डे, संपदा काटे, सविता ठोंबरे, सोनाली मानोरकर आणि क्षितिजा वाघ यांना बेस्ट टीचर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास आष्टी पंचायत समितीचे माजी उपसभापती गोपाळ रक्ताटे, बलभीम शेळके, पांडुरंग माढेकर, माणिकराव विधाते, संतोष यादव, अमोल घोलप, ज्ञानदेव पांडुळे उपस्थित होते. वैदिक गणित न अबकल काळाची गरज : काठमोरे शालेय जीवनात गणित विषय सोपा व रंजक करण्यासाठी अबॅकस शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्ता, एकाग्रता, स्मरणशक्ती आणि तार्किक विचारक्षमतेच्या विकासासाठी अबॅकस व वैदिक गणित ही काळाची गरज आहे, असे मत शिक्षण संचालनालयाचे सहसंचालक रमाकांत काठमोरे यांनी केले.
Source link
अवघ्या 5 मिनिटांत विद्यार्थ्यांनी सोडवली अवघड गणिते!:अहिल्यानगरमध्ये राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश