Headlines

गुरुमंत्र दीक्षा:गुरुपूजनाने चंद्रेश्वर गडावर गुरुपौर्णिमा उत्सव साजरा




येथील पुरातन श्रीक्षेत्र चंद्रेश्वर गडावरील श्री चंद्रेश्वर महादेव मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही बुधवारी (दि. २९) गुरुपौर्णिमा उत्सव सोहळा अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. महामुनी भगवान कपिलमुनीजी व श्रीगुरु चंद्रेश्वर बाबांच्या कृपाशीर्वादाने, महंत बन्सीपुरीजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि स्वामी जयदेवपुरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा धार्मिक उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या मंगलप्रसंगी आलेल्या भाविकांनी गडावर हजेरी लावून गुरुपूजन करत स्वामी जयदेवपुरी महाराजांचे आशीर्वाद घेतले. चंद्रेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच गडावर गर्दी केली होती. उत्सवानिमित्त विविध धार्मिक पार पडले. यात पहाटे चार वाजता श्री चंद्रेश्वर महादेवाचा शास्त्रोक्त पद्धतीने रुद्राभिषेक करण्यात आला. सकाळी पाच वाजता श्री चंद्रेश्वर बाबांच्या समाधीचे पूजन आणि त्यानंतर साडेपाच वाजता सप्तऋषी समाधीचे पूजन करण्यात आले. सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत भाविकांकडून गुरुपूजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर दहा वाजता अ ध्यात्मिक प्रवचन झाले. सकाळी १० ते १२ या वेळेत भाविकांना गुरुमंत्र दीक्षा देण्यात आली. महाआरती झाल्यानंतर महाप्रसादाच्या (भंडारा) वाटपाला सुरुवात झाली. पाथरशेंबे येथील श्री चंद्रेश्वर सेवा मंडळाच्या वतीने सर्व भाविकांसाठी महाप्रसाद वितरित करण्यात आला. सोहळा यशस्वीतेसाठी चंद्रेश्वर भक्त मंडळाने परिश्रम घेतले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *