![]()
अल्पवयीन मुलीवर गेल्या दोन वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून पारनेर पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या एका तासात आरोपीला अटक केली. विठ्ठल मुरलीधर फरतारे (वय ५१, रा. मोहोज देवडे, ता. पाथर्डी, सध्या रा. पारनेर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. २९ जुलै रोजी पीडित मुलीच्या पालकांनी पारनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपीने मागील दोन वर्षांपासून मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच ही बाब कोणाला सांगितल्यास पीडितेला आणि तिच्या कुटुंबीयांना धमकावल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तक्रारीनंतर पारनेर पोलिसांनी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक संतोष खेडकर यांनी गुन्हे शोध पथकाला आरोपीच्या शोधासाठी तातडीने रवाना केले. गोपनीय माहितीच्या आधारे शोध घेत पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या एका तासात आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
Source link
अल्पवयीन मुलीवर अत्याचार:51 वर्षीय नराधमाला अटक