अभिजीत दीपके आंदोलनादरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप करत आहेत. जर तसे असेल आणि दिल्ली पोलिस संबंधित व्यक्तींचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करत असतील, तर त्या कारवाईला विरोध करण्याचे कारण काय? असा सवाल भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे
.
आंदोलनादरम्यान पोलिस कर्मचारी आणि पत्रकारांवर झालेले हल्ले, दगडफेक आणि हिंसाचार हे गंभीर स्वरूपाचे असून, त्याबाबत कठोर कारवाई व्हावी, अशी भूमिका घेण्याऐवजी आरोपींचे समर्थन केल्याचा आभास निर्माण करणारी विधाने अभिजीत दीपके करत असल्याचा आरोप शितोळे यांनी केला.
हातात संविधान घेऊन बोलणाऱ्यांनी कायद्याचा सन्मान राखत हिंसाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करायला हवी होती. मात्र तसे न करता दिशाभूल करणारी भूमिका घेतली जात असल्याने त्यामागील हेतूबाबत जनतेच्या मनात प्रश्न निर्माण होत असल्याचेही ते म्हणाले.
तसेच, अभिजीत दीपके काँग्रेसच्या भूमिकेशी सहमत नसतील, तर कर्नाटक आणि पंजाबमधील कथित पेपर लीक प्रकरणांबाबत संबंधित मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी ते कधी करणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आंदोलनादरम्यान झालेल्या घोषणाबाजी, शिवीगाळ आणि त्यानंतर झालेल्या कथित जल्लोषाबाबतही दीपके यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी केली.
हे ही वाचा…
“पोलिसांवरील दगडफेक भाजपच्याच गुंडांनी केली”:अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप, पोलिसांच्या दुटप्पी भूमिकेवरही सवाल उपस्थित

कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलनात जखमी झालेल्या दिल्ली पोलिस आणि सुरक्षा दलांच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सांगितले की पोलिसांवर देखील दगडफेक झाली. एका पोलिस जवानाच्या मुलीने सांगितले की, ‘माझे वडील जेव्हा घरी यायचे, तेव्हा म्हणायचे की आता हे विद्यार्थ्यांचे आंदोलन राहिलेले नाही, यात चुकीचे लोक सामील झाले आहेत. 20 जुलै रोजी माझ्या वडिलांचे सहकारी त्यांना रात्री 10 वाजता घरी घेऊन आले. त्यांच्या डोक्याला 5 टाके होते. त्यांचा गणवेश रक्ताने माखलेला होता, तरीही सोशल मीडियावर त्यांनाच गुन्हेगार ठरवले गेले.’ कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी पोलिसांवरील दगदफेकीवर प्रतिक्रिया दिली आहे. सविस्तर वाचा…