Headlines

वृक्षारोपण:भराडीच्या वीरशैव लिंगायत स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपण




श्री स.भु. प्रशाला, भराडीचे इको क्लब, राष्ट्रीय सेवा योजना आणि छत्रपती संभाजीनगरच्या ओंजळ सेवाभावी सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने येथील वीरशैव लिंगायत स्मशानभूमीत (३० जुलै) रोजी वृक्षारोपण करण्यात आले. कार्यालयाचे अध्यक्षस्थान राजेंद्र कोठावदे यांनी भूषवले, तर प्रमुख अतिथी म्हणून पं.स. सदस्य नारायण खोमणे उपस्थित होते. तसेच ओंजळ संस्थेच्या अध्यक्षा सुनिता जांभुळकर, कुशीवर्ता साबळे, सचिन घोरपडे, गणेश नरवणे, गणेश फरकाडे आणि प्रा. तानाजी मादळे यांची विशेष उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते बेल, पिंपळ, उंबर, सिसम, अभेटा, चिंच, करंज आणि सीताफळ यांसारख्या विविध प्रकारच्या ३५ रोपांचे रोपण करण्यात आले. कोठावदे यांनी पर्यावरणाचा ढासळणारा समतोल, ग्लोबल वॉर्मिंग आणि जैवविविधतेतील घट यांसारख्या गंभीर समस्यांवर प्रकाश टाकला. या उपक्रमात आतिष धारकर, मनोज धारकर, किशोर धारकर, संदीप मुळे, सागर जगनाडे, भगवान पाटील खोमणे यांच्यासह ग्रामस्थ, इको क्लब आणि एन.एस.एस.चे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश निकम यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजेंद्र तायडे यांनी मानले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *