![]()
आपल्या विविध सामाजिक व शैक्षणिक मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या तरुणाईच्या आंदोलनामुळे ‘जेन-झी’ पिढीच्या एका नव्या आणि अनोख्या भाषेची ओळख देशाला झाली आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी शब्दांची सरमिसळ असलेल्या या डिजिटल अन् शॉर्टकट भाषेने सर्वांचेच लक्ष
.
सोशल मीडिया आणि आधुनिक जीवनशैलीमुळे ही भाषा त्यांच्या रोजच्या संवादाचा अविभाज्य भाग बनली आहे. कमी शब्दांत थेट आणि प्रभावी संदेश देणे हा या भाषेमागचा मुख्य उद्देश आहे. बदलत्या काळानुसार आणि डिजिटल युगाच्या गरजेनुसार भाषेमध्ये असा बदल होणे अत्यंत स्वाभाविक आणि जिवंतपणाचे लक्षण असल्याचे या पिढीतील तरुण वर्गाचे आणि भाषातज्ज्ञांचे स्पष्ट म्हणणे आहे.
या अनोख्या संवाद शैलीमुळे दोन पिढीतील अंतर कमी होऊन विचारांची देवाण घेवाण अधिक वेगाने होत असल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव आणि वेगवान जीवनशैली यामुळे ही नवी भाषा यापुढे संवादाचे एक प्रमुख माध्यम प्रस्तापित होईल, असे भाषा अभ्यासकांचे मत आहे.
भाषेवरून वाद घालण्यापेक्षा समाजाने आमच्या गंभीर मागण्यांकडे अधिक लक्ष द्या
^ प्रत्येक पिढीची बोलण्याची स्वतःची वेगळी शैली असते. डिजिटल युगात लहानाची मोठी झालेल्या आमच्या पिढीसाठी हे शब्द सहजसोपे आहेत. दर पाच दहा वर्षांत बोलीभाषेत इतर भाषेतील शब्दांची भर पडत जाते. ते शब्द बोलीभाषेशी एकरुप होऊन जातात. ते शब्द इतके रुळले जातात की, त्यांना मुळ पर्यायी शब्दही अवघड वाटतात. “जेन-झी’ने केले
ल्या काही अश्लील शब्दांचा वापर चुकीचाच आहे, पण या पिढीच्या बदलत्या भाषेवरून वाद घालण्यापेक्षा समाजाने आमच्या गंभीर मागण्यांकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. – सायली मोहिते, विद्यार्थिनी, अहिल्यानगर.
^ भाषा कधीही एका जागी थांबत नाही. ती वाहत्या पाण्यासारखी सतत प्रवाही असते. दर १०-१५ वर्षांनी भाषेचे स्वरूप बदलत असते. ‘जेन-झी’ पिढीची ही भाषा म्हणजे इंग्रजी, इंटरनेट स्लँग (भावना पटकन व्यक्त करण्यासाठी वापरले जाणारे शब्द) आणि स्थानिक भाषेची सरमिसळ आहे. या बदलाकडे भाषेच्या विकासाचा एक स्वाभाविक भाग म्हणून आपण पाहिले पाहिजे. – लक्ष्मीकांत येळवंडे , मराठी विभागप्रमुख, न्यू आर्टस् कॉलेज.
“जेन-झी’ची भाषा म्हणजे इंग्रजी अन् इंटरनेट स्लँग
ही भाषा आता रोजच्या संवादाचाच भाग ^‘जेन-झी’ पिढीची ही नवी भाषा आता रोजच्या संवादाचाच एक भाग बनली आहे. आंदोलनातील तरुणाईने कोणतेही चुकीचे शब्द वापरलेले नाहीत. कमीत कमी शब्दांत थेट संदेश देणे हाच त्यांचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे या पिढीच्या नवीन भाषा शैलीला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. – कैवल्य चंद्रात्रे, विद्यार्थी, अहिल्यानगर.