![]()
मागील २४ तासांत झालेल्या पावसामुळे लातूर जिल्ह्यातील चार महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सर्वाधिक ७६.५ मिमी पाऊस उदगीर तालुक्यातील मोघा मंडळात झाला. त्याखालोखाल जळकोट मंडळात ६७.८ मिमी पावसाची नोंद झाली. अहमदपूर तालुक्यातील अहमदपूर आणि खंडाळी या दोन्ही मंडळांत प्रत्येकी ६६.३ मिमी पाऊस झाला. या चारही मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाल्याने शेतशिवारात पाणी साचले असून, प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. सलग पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला असला तरी सखल भागांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रतिनिधी | लातूर लातूर शहरात बुधवारी सायंकाळी व गुरुवारी दिवसभर झालेल्या जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. आज थोडा पावसाचा जोर कमी झाला असला तरी उद्या पावसाचा अलर्ट दिला आहे. मात्र, मागील तीन दिवसाच्या पावसाने शहरात ठिकठिकाणी नाले तुंबल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. सम्राट चौक, इस्लामपुरा, जुन्या गावभागासह अनेक मुख्य रस्ते आणि सखल भागातील नाल्या जलमय झाल्याने लातूरकरांची दैना उडाली. या परिस्थितीला निसर्गापेक्षा मानवनिर्मित ”प्लास्टिकचा कचरा” अधिक जबाबदार असल्याचे उघड झाले आहे. त्यात महानगर पालिकाच्या मान्सून पूर्ण कामाचा बोजवारा उडाल्याचे चित्र दिसत आहे. महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी शहरात मान्सूनपूर्व स्वच्छता मोहिम राबवून नाले मोकळे केले होते. असे असतानाही, अवघ्या काही तासांच्या पावसात हे नाले तुंबून रस्त्यावर पाणीच पाणी वाहत होते. या परिस्थितीला स्वच्छता मोहीमेदरम्यान निकृष्ट काम आणि नाल्यांच्या पोटातून बाहेर काढलेला कचरा जो नागरिकांना फेकून दिलेला असतो. या प्रकरणी व्यवस्थित सफाई झाली नसल्याने आणि नागरिकांनी प्लास्टिकच्या पिशव्या, रिकाम्या बाटल्या आणि इतर कचऱ्याचा डोंगर जबाबदार आहे. अनेक बेजबाबदार नागरिकांकडून आणि काही व्यापारी आस्थापनांकडून नाल्यांमध्ये थेट कचरा फेकला जात असल्याने, पाण्याला मार्ग मिळेनासा झाला आहे. पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांचे रूपांतर आता ”प्लास्टिकच्या डंपिंग ग्राऊंड”मध्ये झाल्याचे दिसून येते. यामध्ये प्रशासनाच्या स्वच्छता निरीक्षकांनी आणि लातूर शहरात सलग तीन दिवस झालेल्या पावसामुळे सरासरी पर्जन्यमानात वाढ झाली आहे. २८ जुलै रोजी संपलेल्या २४ तासांत सरासरी १४.८ मिमी पाऊस झाला. दरम्यान, बुधवारी, दि. २९ जुलै दिवसभर पावसाची रिपरिप असल्यामुळे पावसाचे प्रमाण वाढले. गुरूवारी १९.३ मिमी पावसाची नोंद झाली. तर गुरुवारी संततधार पावसाने हजेरी लावली असल्याने यादिवशी ४५.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. एकूण तीन दिवसात ७९.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. एकूण एकूण पाऊस २३७ मिमी झाला असून, यातील ३३ टक्के पाऊस या तीन दिवसात पडला आहे. कर्मचाऱ्यांनी मात्र युद्धपातळीवर काम सुरू ठेवल्याचे सांगितले जाते. मात्र, परिस्थिती जैसे थे दिसून येत आहे. मागील अनेक वर्षांपासून सखल भागात पाणी साचण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. तिथे आजही युद्धपातळीवर काम सुरू असतानाही नाल्या तुंबलुन बाहेर पाणी वाहत असते. परिसरात चिखल, दुर्गंधी आणि पावसाच्या माऱ्यानंतर कीटकांचा त्रास सहन करावे लागते. अनेक ठिकाणी त्यांच्या प्रयत्नांमुळेच नाले, रस्ते मोकळे झाले आहेत. तर ‘ए’ आणि ‘बी’ झोनमध्ये राजीव गांधी चौक परिसरातील एक-दोन तक्रारी वगळता इतर ठिकाणी मोठी अडचण उद्भवली नसल्याचे संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी सांगितले. मान्सून हंगामात प्रथमच धरणाच्या पाणीसाठ्यात ०.२५ टक्क्यांची वाढ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणातील पाणीसाठा १५.३९ टक्क्यांवर आला होता. मात्र गेल्या तीन दिवसांतील पावसामुळे चालू मान्सून हंगामात प्रथमच धरणाच्या पाणीसाठ्यात ०.२५ टक्क्यांची वाढ झाली आहे. सध्या धरणात १५.६४ टक्के, म्हणजेच २७.६७३ दलघमी इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. महापालिका यंत्रणेसह निसर्गापेक्षा मानवनिर्मित कचऱ्यामुळे अधिक धोका महानगरपालिकेची यंत्रणा असली, तरी जोपर्यंत नागरिक रस्त्यावर आणि नाल्यांमध्ये कचरा फेकणे थांबवणार नाहीत, तोपर्यंत ही समस्या सुटणार नाही. रस्त्यावर टाकलेली एक प्लास्टिकची पिशवी पावसाळ्यात संपूर्ण परिसराला जलमय करू शकते, हे आता लातूरकरांनी समजून घेण्याची वेळ आली आहे.
Source link
मान्सूनपूर्व कामाची पोलखोल:कमी पावसातही लातूर प्लास्टिक कचऱ्याने तुंबले