Headlines

राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार:नाशिक-पुणे घाटमाथ्याला ऑरेंज, तर 8 जिल्ह्यांना यलो अलर्ट; शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण




राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून पुढील काही दिवसही जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाची तीव्रता वाढली असून अनेक धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. आज नाशिक आणि पुणे घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून कोकण आणि घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा, नंदुरबार, कोल्हापूर, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. दक्षिण गुजरातपासून केरळपर्यंत तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आणि मध्य प्रदेश, विदर्भ व मध्य महाराष्ट्राकडे सक्रिय होत असलेली हवामान प्रणाली यामुळे राज्यातील अनेक भागांत पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सॅटेलाइट नकाशात मान्सूनच्या ढगांची स्थिती पाहा.. राज्यात 24 तासांत 52 मिमी, मराठवाड्यात यंदा प्रथमच 109 मंडळांत अतिवृष्टी राज्यात गेल्या २४ तासांत ५१.०९ मिमी पाऊस झाल्याने अपेक्षित पावसाची सरासरी ओलांडली. जून, जुलैमध्ये १०४.१ टक्के पाऊस झाला. पावसाळ्याच्या पहिल्या दोन महिन्यांत राज्यात ५२७.८ मिमी अपेक्षित असताना ५६०.७ मिमी पाऊस झाला. कोकण (१०८.९ टक्के), छत्रपती संभाजीनगर (१०१.७ टक्के) आणि अमरावती विभागाने (१०६.४ टक्के) अशी अपेक्षित पावसाने टक्केवारी ओलांडली. शुक्रवारी मराठवाड्यात परभणी वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस झाला. एकूण १०९ मंडळांत अतिवृष्टी झाली. त्यात जालन्यातील ३९, छत्रपती संभाजीनगर ३३, हिंगोली २७, बीड ६ तर लातूरातील ४ मंडळांचा समावेश आहे. हिंगोलीतील माळहिवरा व सिरसम या २ मंडळांमध्ये सर्वाधिक प्रत्येकी १७३ मिमी पाऊस झाला. तसेच जिल्ह्यात २४ तासात १०३ मिमी पाऊस झाल्याने २० वर्षांचे रेकॉर्ड मोडले. दरम्यान, पारोळा येथे एक तरुण वाहून गेला. तर पाचोऱ्यात भिंत पडून एक ठार झाला. नाशिक शहर व जिल्हा : या वर्षी जुलै महिन्याने पावसाचे मागील सोळा वर्षांचे सर्व विक्रम मोडीत काढले. यंदाच्या जुलै महिन्यात तब्बल ६७६ मिलिमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली. “जल’गाव: एकाच दिवसात १०३ मिमी पाऊस; २० वर्षांनी विक्रमी! जून महिन्यात हुलकावणी देणाऱ्या पावसाने जुलैअखेर जोरदार बॅटिंग करत संपूर्ण तूट भरून काढली. मागील २४ तासांत जिल्ह्यात १०३ मिमी पाऊस झाला. या पावसाने गेल्या २० वर्षांचे रेकॉर्ड मोडीत काढले. यापूर्वी ५ जुलै २००६ रोजी जिल्ह्यात २२२ मि.मी. पाऊस झाला होता, त्यानंतर दोन दशकांनी म्हणजेच ३० जुलैच्या रात्री मुसळधार पाऊस बरसला. १५ पैकी १४ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. दरम्यान, खान्देशात वेगवेगळ्या घटनेत पाच जण वाहून गेले. तर पारोळ्यातील वसंत नगरात भिंत पडून एका वृद्धाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात जून महिन्यात १२३.७ मि.मी. या अपेक्षित सरासरीच्या तुलनेत अवघा ८५.६ मि.मी. (६९.२ टक्के) पाऊस झाला होता. या महिन्याची कसर पावसाने जुलैच्या शेवटच्या दोन दिवसांत भरून काढली. १ जून ते ३१ जुलै या दोन महिन्यांच्या कालावधीत जळगाव जिल्ह्याची एकूण सरासरी ३१२.९ मि.मी. आहे. या तुलनेत जिल्ह्यात आतापर्यंत ३३५.६ मि.मी. म्हणजेच सरासरीच्या १०७.३ टक्के पाऊस झाला. दरम्यान, राज्यात गेल्या २४ तासात ५१.०९ मिमी पाऊस झाल्याने अपेक्षित पावसाची सरासरी ओलांडली. जुन, जुलैमध्ये १०४.१ टक्के पाऊस झाला. पावसाळ्याच्या पहिल्या दोन महिन्यात राज्यात ५२७.८ मिमी अपेक्षित असताना ५६०.७ मिमी पाऊस झाला. अहिल्यानगर‎: मध्यरात्रीपासून दुपारपर्यंत रिपरिप;‎पाऊस सरासरीच्या ५० टक्क्यांवर‎ जिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्रीपासून शुक्रवारी दुपारपर्यंत‎पावसाची रिपरिप सुरू राहिल्याने खरीप पिकांना मोठा‎दिलासा मिळाला आहे. मागील २४ तासांत जिल्ह्यात‎सरासरी १४.३ मिमी पाऊस झाला असून, १ जूनपासून‎आजपर्यंत एकूण २२७.४ मिमी पाऊस झाला. या‎पावसामुळे जिल्ह्याने आतापर्यंत मोसमी सरासरीच्या ५०‎टक्क्यांहून अधिक टप्पा ओलांडला.‎ जिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्री सुरू झालेला पाऊस‎शुक्रवारी दुपारी २ वाजेपर्यंत कायम होता. शहरातील मध्य‎भागासह सावेडी, भिंगार, केडगाव आणि कल्याण रोड या‎भागात दुपारपर्यंत पाऊस बरसतच होता. आतापर्यंत‎अकोले तालुक्यात सर्वाधिक ४८६.३ मिमी (१९०.२‎टक्के) पाऊस झाला आहे. गेल्या २४ तासांत सर्वाधिक‎पाऊस शेवगाव ३१.३ मिमी आणि जामखेडमध्ये २४.३‎मिमी झाला. अहिल्यानगरमध्ये १४.१, पारनेर ७.८, श्रीगोंदे‎२०.९, कर्जत २०.४, पाथर्डी २३.३, नेवासे १२.३, राहुरी ११.१,‎संगमनेर ६.३, अकोले ५.६, कोपरगाव ११.६, श्रीरामपूर‎८.०, राहाता १०.० मिमी पाऊस झाला.‎ हेही वाचा.. गुजरातच्या सुरतेत 24 तासांत 24 इंच पाऊस:यूपीत 6 घरांना सरयूत जलसमाधी; महाराष्ट्र, राजस्थानसह 6 राज्यांना अलर्ट गुजरातमध्ये शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. सुरतमध्ये सर्वाधिक २४ इंच पावसाची नोंद झाली, तर इतर १२ भागांत १० इंचांहून अधिक पाऊस पडला. भारतीय हवामान विभागाने (IMD) शनिवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. डोंगराळ भागात सतत पडणाऱ्या पावसामुळे उत्तर प्रदेशातील गंगा, घाघरा आणि सरयू यांसारख्या १० नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. बलियामध्ये सरयू नदीच्या प्रवाहात एकाच दिवसात नऊ घरे वाहून गेली आहेत. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *