![]()
संत कान्होपात्रा पांडुरंगाचे दर्शन घेते व वर्णन करते. माझ्या जीवाचे जीवन । तो विठ्ठल निधान ।। उभा असे विटेवरी । वाटी प्रेमाची शिदोरी ।। अवलियाची धनी । निवारितो चक्रपाणी ।। भेटा दयेच्या सागरा । विनवितसे कान्होपात्रा ।। या अभंगातील प्रत्येक शब्द पांडुरंगाचे वर्णन करणारा आहे, त्यामध्ये जीवाचे जीवन म्हणजे पांडुरंग, प्रेमाची शिदोरी म्हणजे पांडुरंग, संकटे निवारण करणारा पांडुरंग, दयेचा सागर म्हणजे पांडुरंग होय, यातून पांडुरंगाविषयीचा भक्ती भाव प्रगट होतो असे प्रतिपादन “संत कान्होपात्रा अभंग चिंतन” याचे विवेचन करताना ॲड. जयवंत बोधले महाराज धामणगावकर यांनी अतिशय मार्मिक शब्दांत केले. ते मंगळवेढा येथील श्रीराम पॅलेस येथे स्व. लक्ष्मीबाई (नीलाई) बाजीराव काळुंगे यांचे स्मरणार्थ धनश्री, सिताराम व आष्टी परिवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय प्रवचन मालेत पहिले पुष्प गुंफताना शुक्रवारी सायंकाळी बोलत होते. प्रवचन मालेचे हे दहावे वर्ष आहे. सुरवातीला दीप प्रज्वलन करून भेट, संवाद आणि संगती या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या प्रवचनाला सुरुवात करण्यात आली.याप्रसंगी धनश्री परिवाराचे प्रमुख प्रा. शिवाजीराव काळुंगे, ज्ञानदेव जावीर, डॉ. आप्पासाहेब पुजारी, प्रा. शोभाताई काळुंगे, रामचंद्र जगताप, ॲड. भारत पवार, अजित जगताप, सुनिता सावंत आदी उपस्थित होते. कान्होपात्राने पांडुरंगाची भक्ति केली पांडुरंगाच्या दर्शनामध्ये केवळ एका संताचे दर्शन होते, पांडुरंगाच्या चरणामध्ये कान्होपात्राचे स्थान आहे. भगवंताच्या भक्तिला त्या पात्र झाल्या, भगवंत भक्ती येण्यासाठी पात्रता यावी लागते, योग्यता पात्रता अधिकार लागतो. कान्होपात्राने पांडुरंगाची भक्ती केली, त्या भक्तीच्या जोरावर पांडुरंगाच्या चरणाशी अखंड लीन झाली. भक्ति संप्रदायाचा इतिहास वारकऱ्यांनी कान्होपात्रेला मंगळवेढ्यात सांगितला, ते ऐकून कान्होपात्रेच्या मनामध्ये पंढरपूरला जाण्याची व भेटण्याची जिज्ञासा, उत्सुकता निर्माण झाली.
Source link
संत कान्होपात्रांना विठ्ठल चरणी जागा मिळाली:ॲड. जयवंत बोधले महाराज यांचे प्रतिपादन, मंगळवेढ्यात पाच दिवसीय प्रवचन माला