Headlines

गजानन महाराज पालखी स्वागतासाठी बार्शीकर सज्ज:प्रशासनाकडून जय्यत तयारी, आज होणार आगमन‎‎




सालाबाद प्रमाणे यंदाही श्रीक्षेत्र शेगाव (जिल्हा बुलढाणा) येथील आषाढी वारी करून परतीच्या प्रवासाला निघालेल्या संतश्रेष्ठ श्री. गजानन महाराज पालखीचे शहरात शनिवारी (ता. १) सकाळी ७ वाजता सुमारास बार्शी कुर्डुवाडी रोडवर जैन मंदिरानजीक आगमन होणार आहे. श्रींच्या स्वागतासाठी भगवंत नगरीदेखील सज्ज झाली आहे. दरम्यान शुक्रवारी (ता. ३१ जुलै) सायंकाळी कुर्डवाडी येथून खांडवी (ता. बार्शी) येथील भगवान करजखेडे यांच्या शेतातील मोकळ्या जागेत श्रीची पालखी भाविकांना दर्शनासाठी परंपरेने मुक्कामी ठेवण्यात येते. पालखीचे मागील ५७ वर्षांपासून पालखी अविरतपणे खांडवीतील करजखेडे यांच्या शेतात मुक्कामी असते. पालखी समवेत यंदा ७०० वारकरी असून २५० पताकाधारी २५० टाळकरी व २०० सेवेकरी असा मोठा ताफा आहे. बार्शी कुर्डूवाडी रोडवर पुरातन रामेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने श्री रामेश्वर मंदिरात शनिवारी सकाळी ८ ते ११ या वेळेत पालखी दर्शनासाठी ठेवण्यात येते. रामेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने पायघड्या अंथरून, आरती करून स्वागत केले जाते. भोजन वाढण्यासाठी बार्शीचे प्रसन्नदाता गणेश मंडळाचे स्वयंसेवक सहकार्य करतात अशी माहिती रामेश्वर मंदिराचे व्यवस्थापक गाढवे यांनी दिली. भाविकांना दिवसभर मि‌ळणार पालखी दर्शन रामेश्वर मंदिरातून पालखी शहरातील प्रमुख मार्गाने ग्रामदैवत श्री.भगवंत मंदिरात जाते व त्यानंतर बार्शी नगर परिषदेच्या शनी मंदिर शेजारी क्रीडा भवन सभागृहातमध्ये दिवसभर दर्शनासाठी पालखी ठेवण्यात येणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *