Headlines

तिसरे अपत्य अन् अतिक्रमण भोवणार!:छत्रपती संभाजीनगरमध्ये २३ नगरसेवकांना अपात्रतेची नोटीस; भाजपसह एमआयएमला मोठा धक्का




छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या राजकारणात एक अतिशय मोठी आणि खळबळजनक घडामोड घडली आहे. महापालिका प्रशासनाने तब्बल 23 नगरसेवकांना अपात्रतेच्या नोटिसा बजावल्या असून, त्यांच्या नगरसेवकपदावर आता टांगती तलवार निर्माण झाली आहे. या कारवाईमुळे सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष असलेल्या एमआयएमला (MIM) मोठा धक्का बसला असून, शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अपात्रतेच्या नोटिसांमागील प्रमुख कारणे महापालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 (कलम 10 ड-1) अंतर्गत या नगरसेवकांविरोधात अपात्रतेच्या याचिका दाखल केल्या होत्या. या तक्रारी खालील गंभीर मुद्द्यांवर आधारित आहेत. कोणावर आहे कारवाईची टांगती तलवार? प्रशासनाने शुक्रवारी (31 जुलै) एकूण 37 नोटिसा जारी केल्या आहेत. या कारवाईच्या कक्षेत 23 नगरसेवकांचा समावेश आहे. एमआयएम (MIM): सर्वाधिक 16 नगरसेवकांचा समावेश. यामध्ये एमआयएमचे विरोधी पक्षनेते अब्दुल समीर साजिद यांना प्रामुख्याने दोन नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. भाजप (BJP): सत्ताधारी भाजपच्या 7 नगरसेवकांचा समावेश. यामध्ये प्रामुख्याने गणेश नावंदर आणि जीवकपाल हिवराळे या नगरसेवकांचा समावेश आहे. प्रशासनाची प्राथमिक चौकशी पूर्ण तक्रारी प्राप्त झाल्यानंतर महापालिकेचे नगर सचिव, जन्म-मृत्यू नोंदणी विभाग आणि अतिक्रमण विभागाकडून या प्रकरणांची प्राथमिक चौकशी करण्यात आली. या चौकशीच्या आधारावरच प्रशासनाने सर्व संबंधित 23 नगरसेवकांना नोटिसा पाठवून त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अंतिम सुनावणी या प्रकरणावर आता ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात वेगवेगळ्या तारखांना सुनावणी पार पडणार आहे. प्रशासनाने नोटिशीत स्पष्ट इशारा दिला आहे की, सुनावणीदरम्यान संबंधित नगरसेवकांनी आवश्यक कागदपत्रांसह हजर राहून समाधानकारक उत्तर न दिल्यास, त्यांच्या विरोधात एकतर्फी निर्णय घेतला जाईल. या 23 नगरसेवकांवर जर अपात्रतेची कारवाई निश्चित झाली, तर महापालिकेतील संख्याबळ लक्षणीयरीत्या बदलेल. सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष असलेल्या एमआयएमचे एवढ्या मोठ्या प्रमाणावर नगरसेवक अपात्र ठरल्यास, छत्रपती संभाजीनगरच्या स्थानिक राजकारणाला आणि आगामी राजकीय घडामोडींना एक नवी दिशा मिळू शकते. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता प्रशासनाच्या अंतिम सुनावणीकडे लागले आहे. हेही वाचा.. गुजरातच्या सुरतेत 24 तासांत 24 इंच पाऊस:यूपीत 6 घरांना सरयूत जलसमाधी; महाराष्ट्र, राजस्थानसह 6 राज्यांना अलर्ट गुजरातमध्ये शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. सुरतमध्ये सर्वाधिक २४ इंच पावसाची नोंद झाली, तर इतर १२ भागांत १० इंचांहून अधिक पाऊस पडला. भारतीय हवामान विभागाने (IMD) शनिवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. डोंगराळ भागात सतत पडणाऱ्या पावसामुळे उत्तर प्रदेशातील गंगा, घाघरा आणि सरयू यांसारख्या १० नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. बलियामध्ये सरयू नदीच्या प्रवाहात एकाच दिवसात नऊ घरे वाहून गेली आहेत. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *