Headlines

तरुणांच्या चुका माफ करणे हा पंतप्रधानांच्या मनाचा मोठेपणा:प्रफुल्ल पटेल यांच्याकडून मोदींच्या भूमिकेचे स्वागत




पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच जारी केलेल्या एका व्हिडिओ संदेशावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी नागपूर येथे सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. तरुणांकडून उत्साहाच्या भरात होणाऱ्या चुका माफ करण्याच्या पंतप्रधानांच्या भूमिकेचे पटेलांनी भरभरून कौतुक केले असून, हा मोदींच्या मनाचा मोठेपणा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘तरुणांना माफ करण्यात कोणताही कमीपणा नाही’ प्रफुल्ल पटेल म्हणाले, “आपल्या देशातील मुले आणि तरुण हेच या देशाचे खरे भविष्य आहेत. अनेकदा तारुण्याच्या सळसळत्या उत्साहात आणि जोशात, तर कधी कधी इतरांच्या प्रभावाखाली येऊन या तरुणांच्या तोंडून काही अयोग्य शब्द निघून जातात. अशावेळी या मुलांना माफ करण्यात कोणताही कमीपणा नाही, अशी भूमिका पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केली आहे. याउलट, मी याकडे पंतप्रधानांच्या मनाचा मोठेपणा म्हणून पाहतो.” ‘लोकशाही मार्गाने सर्वांना सोबत घेऊनच देशाची प्रगती’ देशाच्या वाटचालीबाबत बोलताना पटेल यांनी लोकशाही मूल्यांवर भर दिला. ते म्हणाले, “आपला देश केवळ आणि केवळ लोकशाही मार्गानेच चालू शकतो. सर्वांना सोबत घेऊन आपण जेव्हा पुढे जाऊ, तेव्हाच या राष्ट्राची खऱ्या अर्थाने भरभराट आणि प्रगती होईल. देशाला पुढे नेण्याचा हाच एकमेव मार्ग आहे.” तरुण पिढीला योग्य दिशा देण्याची गरज पंतप्रधानांच्या या सकारात्मक दृष्टिकोनाचे स्वागत करताना प्रफुल्ल पटेल यांनी शेवटी नमूद केले की, “आजची तरुण पिढी हे खरोखरच या देशाचे भविष्य आहे. त्यामुळे त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे आणि योग्य दिशा दाखवणे अत्यंत गरजेचे आहे. पंतप्रधान मोदी सध्या हेच काम करत असून, ही अतिशय सकारात्मक आणि चांगली गोष्ट आहे.” हेही वाचा.. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा आज पुणे दौरा:काँग्रेस-भाजप आमनेसामने येण्याची शक्यता, शहराला छावणीचे स्वरूप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज (शनिवार, 1 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते सर्वप्रथम सारसबाग येथील स्मारकाला भेट देऊन लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करतील. त्यानंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात ते उपस्थित राहून त्यांच्या हस्ते लोकमान्य टिळक पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. सविस्तर वाचा पुण्यात आर्मी का बोलावली, एवढे का घाबरताय शहा?: संजय राऊतांची अमित शहांवर टीका, 2029 पूर्वीच मोदी-शहा सत्तेतून जाणार असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यावरून खासदार संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला आहे. संसदेचे अधिवेशन सुरू असताना त्याकडे पाठ फिरवून अमित शहा रात्रीच्या अंधारात पुण्यात आले आहेत. ‘नीट’ पेपरफुटीला गृहखातेच जबाबदार असून विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे शहांचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने माखले आहेत, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *