Headlines

BJP Leader Navnath Ban Slams Sanjay Raut, Uddhav Thackeray


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणारे शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी अत्यंत तीक्ष्ण शब्दांत पलटवार केला आहे. “संजय राऊत आणि त्यांचे मालक उद्धव ठाकरे हे दोघेह

.

संजय राऊतांच्या गोळ्या संपल्यात, सिंगापूरमध्ये उपचार करू

संजय राऊत यांनी पंतप्रधानांचे मानसिक संतुलन बिघडल्याची टीका केल्यानंतर नवनाथ बन म्हणाले, “ज्यांना अभिजीत दिपके हे विष्णूचा अवतार वाटतात, तेच खरे मेंटल आहेत. स्वतःच्या मृत आईवर शिव्या दिल्यानंतरही तरुणांना माफ करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे सक्षम नेतृत्व आहेत. संजय राऊतांच्या मेंटल गोळ्या संपल्या आहेत, म्हणूनच ते अशी विधाने करत आहेत. महाराष्ट्रातील उपचाराने संजय राऊत बरे होणार नाहीत. सिंगापूरमध्ये जगातील सर्वात मोठे मेंटल हॉस्पिटल आहे. गरज पडल्यास आम्ही वर्गणी गोळा करून संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना तिथे उपचारासाठी पाठवण्याची व्यवस्था करू.”

उबाठा पक्षाचा डायपर गळतोय, राऊतांनी आधी तो सांभाळावा

गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्याला विरोध करणाऱ्या आणि त्यांच्यावर टीका करणाऱ्या राऊतांना त्यांनी खणखणीत उत्तर दिले. “अमित शहा हे या देशाचे लोहपुरुष आहेत. त्यांनी कलम 370 हटवले, काश्मीरमधील दगडफेक थांबवली. पण संजय राऊत हे बुरसटलेल्या विचारांचे ‘बुरशी पुरुष’ आहेत. त्यांच्या पक्षाचा ‘डायपर’ गळत असून रोज आमदार, खासदार आणि नगरसेवक पक्ष सोडून जात आहेत. आधी त्यांनी स्वतःचा पक्ष सांभाळावा. अमित शहा कधीही पळून जाणारे नाहीत. पळपुटे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे आहेत, ज्यांना महाराष्ट्रातील जनतेने प्रत्येक निवडणुकीत पळवून लावले आहे.”

शिवसेना आमदारांवर व नेत्यांवर राऊतांनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना बन म्हणाले, “जयकुमार गोरे यांना जनतेने चार वेळा निवडून दिले आहे. राऊतांना साधी भांडूपची नगरसेवकपदाची जागा निवडून आणता येत नाही. संजय राऊत हे उबाठा गटाची जमीन भुसभुशीत करून पक्ष संपवणारे गांडूळ आहेत. त्यांनी स्वतः पक्षाचा हिंदुत्वाचा लिलाव काँग्रेसच्या दावणीला बांधून केला आहे.”

एआय (AI) व्हिडिओ प्रकरणी काँग्रेस नेते भाई जगताप यांच्यावर गुन्हा दाखल

सोशल मीडियावर दिशाभूल करणारा व्हिडिओ पोस्ट केल्याप्रकरणी काँग्रेस नेते भाई जगताप यांच्यावर कारवाई झाल्याची माहिती त्यांनी दिली. “काँग्रेस नेते भाई जगताप यांनी एक्सवर दिल्ली पोलिसांचा बनावट आणि ‘एआय जनरेटेड’ व्हिडिओ पोस्ट करून अफवा पसरवण्याचा आणि दंगे भडकवण्याचा प्रयत्न केला. भाजप सोशल मीडियाचे सहसंयोजक निखिल भामरे यांच्या तक्रारीवरून भाई जगताप यांच्यावर सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.” तरुणांची माथी भडकवणाऱ्या भाई जगताप यांच्यावर पोलिसांनी तातडीने चार्जशीट दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

सुप्रिया सुळेंना टोला- मविआच्या काळातील पेपरफुटीचे उत्तर द्या

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नांवर बोलताना बन म्हणाले, “पंतप्रधान मोदी यांनी संसदेत 10 पट दंड आणि कठोर शिक्षेची तरतूद असलेला अँटी-पेपर लीक कायदा आणला आहे. त्यामुळे यापुढे देशामध्ये पेपर फुटणार नाही. सुप्रिया ताईंनी आधी महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेल्या टीईटी आणि म्हाडा पेपरफुटीवर उत्तरे द्यावीत. पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे की कोणत्याही निष्पाप विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल होणार नाहीत. मोदींवर वैयक्तिक टीका करूनही त्यांनी तरुणांना माफ करून मोठा मनमोकळेपणा दाखवला आहे,” असे बन यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा..

पुण्यात आर्मी का बोलावली, एवढे का घाबरताय शहा?:संजय राऊतांची अमित शहांवर टीका, 2029 पूर्वीच मोदी-शहा सत्तेतून जाणार असल्याचा दावा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यावरून खासदार संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला आहे. संसदेचे अधिवेशन सुरू असताना त्याकडे पाठ फिरवून अमित शहा रात्रीच्या अंधारात पुण्यात आले आहेत. ‘नीट’ पेपरफुटीला गृहखातेच जबाबदार असून विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे शहांचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने माखले आहेत, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.