Headlines

मुलांना माफ करण्याऐवजी देशातील विद्यार्थ्यांची माफी मागा:पंतप्रधान मोदींवर नाना पटोलेंची टीका, अमित शहांच्या राजीनाम्याचीही मागणी




पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच त्यांना शिवीगाळ करणाऱ्या मुलांना माफ केल्याचे वक्तव्य केले होते. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘एक्स’ अकाऊंटवरून पंतप्रधानांवर जोरदार पलटवार केला आहे. तुम्हीच देशाची माफी मागावी मुलांना माफ करण्याचे नाटक करण्याऐवजी पंतप्रधान महोदय, आपणच देशातील मुलांची माफी मागायला हवी, अशी थेट मागणी नाना पटोले यांनी केली आहे. मुले मनाने निरागस आणि प्रामाणिक असतात. समाजात जे घडते, त्यातूनच ती शिकतात. सोशल मीडियावर द्वेष पसरवणाऱ्या आणि अपमानास्पद भाषा वापरणाऱ्या व्यक्तींना जेव्हा प्रोत्साहन मिळते, तेव्हा त्याचा थेट परिणाम मुलांच्या मनावर होतो, असे पटोले म्हणाले. संसदेतील अवमानकारक भाषेची आठवण संसदेसारख्या सर्वोच्च सभागृहात जेव्हा “काँग्रेस की जर्सी गाय”, “पचास करोड की गर्लफ्रेंड”, “शुर्पनखा” अशा शब्दांचा वापर होतो, तेव्हा पंतप्रधान म्हणून तुम्हाला ‘सांस्कृतिक’ किंवा नैतिक धक्का का बसला नाही? असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला. पीडित असल्याचा आव आणू नका पंतप्रधान आणखी किती काळ स्वतःला पीडित असल्याचे भासवणार आहेत? दुसऱ्यांच्या आईबद्दल बोलताना तुम्ही स्वतःच पंतप्रधानपदाच्या गरिमेला धक्का पोहोचवला आहे, अशी बोचरी टीका त्यांनी केली. मुलांना माफ करण्याची भाषा करण्यापूर्वी, आंदोलन करणाऱ्या ज्या निष्पाप विद्यार्थ्यांवर पेलेट गनचा वापर झाला आणि अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला, त्या विद्यार्थ्यांची आधी माफी मागावी. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी तरुण विद्यार्थी आणि नागरिक सर्व काही पाहत आहेत. त्यामुळे केवळ माफ करण्याचे नाटक करून चालणार नाही, तर विद्यार्थ्यांवर लाठीहल्ल्याचे आदेश देणारे गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान मोदी यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे, अशी आक्रमक भूमिका नाना पटोले यांनी मांडली आहे. दात आणि जीभ आपलीच असते, मी तिला माफ करू इच्छितो’: पंतप्रधान मोदी या वादानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ जारी करून देशातील जनतेशी आणि तरुणांशी संवाद साधला. “काही खोडकर मुलांनी मला आणि माझ्या दिवंगत आईबद्दल अत्यंत अश्लाघ्य शब्दांत शिवीगाळ केली. हा प्रकार दुर्दैवी आणि कोणत्याही सुसंस्कृत समाजाला न शोभणारा आहे. पण बालपणी चुका होतात, आणि त्या सुधारण्याची संधीही मिळायला हवी. ही दिशाभूल झालेली मुले आहेत.” पंतप्रधानांनी माफ केले “त्यांना शिक्षा देणे, न्यायालयांच्या फेऱ्या मारायला लावणे किंवा त्यांचा छळ करणे, यामुळे परिस्थिती बदलणार नाही. मी त्यांना माफ करू इच्छितो आणि समाजानेही ही भूमिका स्वीकारावी. कधी कधी दातांखाली जीभ येऊन रक्त निघते, म्हणून आपण दात तोडत नाही, कारण दात आणि जीभ दोन्ही आपलीच असतात,” असे सामंजस्याचे विचार मोदींनी मांडले. ती माझी शेवटची चूक, मला लाज वाटतेय; तरुणीचा माफीनामा पंतप्रधानांच्या या आवाहनानंतर काही तासांतच रुचिका सिंग हिने एक व्हिडिओ जारी करत जाहीर माफी मागितली. “जंतरमंतरवर काही लोक पंतप्रधानांना शिव्या देत होते. त्यांच्या चिथावणीला बळी पडून मी अपशब्द वापरले. माझे कृत्य क्षम्य नाही, पण मी देशवासीयांची माफी मागते. मला माझ्या कृत्याची एवढी लाज वाटतेय की मी कोणाशी नजर मिळवू शकत नाही. ही माझी पहिली आणि शेवटची चूक आहे, कृपया मला माफ करा,” असे ती हात जोडून म्हणाली. पोलिसांची कारवाई सुरूच; ‘झीरो FIR’ दाखल सर्वोच्च न्यायालयाच्या महिला वकील स्मृती सिंग यांच्या तक्रारीवरून नोएडाच्या एक्सप्रेसवे पोलीस ठाण्यात रुचिका सिंगविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 352, 353(1) आणि 356(1) अंतर्गत जाणीवपूर्वक अपमान करणे, सार्वजनिक उपद्रव आणि मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा झीरो FIR असून पुढील तपासासाठी तो नवी दिल्लीतील संसद मार्ग पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. रुचिका सध्या कुटुंबासह फरार असल्याचे समजते आणि पोलिसांची शोधमोहीम सुरू आहे. संविधानिक पदाचा अपमान करून द्वेष पसरवल्याबद्दल कठोर कारवाईची मागणी तक्रारदार वकिलांनी केली आहे. हेही वाचा… केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा आज पुणे दौरा:काँग्रेस-भाजप आमनेसामने येण्याची शक्यता, शहराला छावणीचे स्वरूप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज (शनिवार, 1 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते सर्वप्रथम सारसबाग येथील स्मारकाला भेट देऊन लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करतील. त्यानंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात ते उपस्थित राहून त्यांच्या हस्ते लोकमान्य टिळक पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. सविस्तर वाचा पुण्यात आर्मी का बोलावली, एवढे का घाबरताय शहा?: संजय राऊतांची अमित शहांवर टीका, 2029 पूर्वीच मोदी-शहा सत्तेतून जाणार असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यावरून खासदार संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला आहे. संसदेचे अधिवेशन सुरू असताना त्याकडे पाठ फिरवून अमित शहा रात्रीच्या अंधारात पुण्यात आले आहेत. ‘नीट’ पेपरफुटीला गृहखातेच जबाबदार असून विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे शहांचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने माखले आहेत, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *