Headlines

Maharashtra PMFBY Crop Insurance Deadline Extended Till August 10



राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत ‘प्रधानमंत्री पीक विमा योजने’ला मुदतवाढ दिली आहे. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची मूळ अंतिम मुदत 31 जुलै 2026 होती, मात्र तांत्रिक अडचणींमुळे अनेक शेतकरी अर्ज करण्यापासून वंचित राहिल्याने आता ही मुदत 10 ऑगस्टपर

.

पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी पीक कर्जदार शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित बँकेशी संपर्क साधावा, तर कर्ज न घेतलेल्या बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी ‘pmfby.gov.in’ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन किंवा जवळच्या सेवा केंद्रामार्फत आपला अर्ज भरावा. यासोबतच ‘PMFBY Crop Insurance’ या मोबाईल ॲपद्वारेही थेट ऑनलाईन अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी 10 ऑगस्टपर्यंत आपली अर्ज प्रक्रिया पूर्ण करून या महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

पीक विमा योजनेच्या नोंदणीसाठी आणखी आठ दिवसांची मुदतवाढ

राज्यात आतापर्यंत तब्बल 61 लाख 82 हजार 218 शेतकऱ्यांनी ‘प्रधानमंत्री पीक विमा योजने’अंतर्गत अधिकृत नोंदणी केली आहे. मात्र, वेबसाईट संथ चालणे, इंटरनेटचा वेग कमी असणे आणि इतर अनेक तांत्रिक अडचणींमुळे अद्यापही काही शेतकरी या प्रक्रियेपासून वंचित राहिल्याचे निदर्शनास आले. या परिस्थितीची दखल घेत राज्य सरकारने पीक विमा योजनेच्या नोंदणीसाठी आणखी आठ दिवसांची मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, यामुळे उर्वरित शेतकऱ्यांना आपला अर्ज भरण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळणार आहे.

योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद

या योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला असून, उपलब्ध आकडेवारीनुसार छत्रपती संभाजीनगर विभागातून सर्वाधिक 13 लाख 25 हजार शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी नोंदणी केली आहे. त्यापाठोपाठ अमरावती (6,91,973), पुणे (6,07,663) आणि नागपूर (4,53,383) या विभागांचा क्रमांक लागतो. तसेच नाशिक विभागातून 3,33,385, लातूरमधून 2,42,826, कोल्हापूरमधून 2,40,253 आणि कोकण विभागातून 1,02,335 शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. या सर्व विभागांतील आकडेवारी मिळून आतापर्यंत एकूण 61 लाख 82 हजार 218 शेतकरी या योजनेत यशस्वीरित्या सहभागी झाले आहेत.

वाढीव मुदतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा- कृषिमंत्री

राज्यातील एकही पात्र शेतकरी ‘प्रधानमंत्री पीक विमा योजने’च्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी राज्य सरकार आणि कृषी विभाग विशेष काळजी घेत असल्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी स्पष्ट केले आहे. ‘अल निनो’चे संभाव्य संकट लक्षात घेता, ज्या शेतकऱ्यांना अद्याप या योजनेत सहभाग नोंदवता आलेला नाही, त्यांनी कोणताही विलंब न करता 10 ऑगस्टपर्यंत मिळालेल्या या वाढीव मुदतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे महत्त्वाचे आवाहनही कृषिमंत्र्यांनी केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *