Headlines

गांधीग्रामची कामे पूर्ण करा- आ. सावरकर:अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींची कावड यात्रेच्या अनुषंगाने संयुक्त पाहणी‎




यंदा होणाऱ्या कावड व पालखी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी भाजप लोकप्रतिनिधी, भारतीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्तपणे गांधीग्राम येथे पाहणी केली. शिवभक्तांना कोणत्याही प्रकारची अडचण येता कामा नये अशा सूचना आमदार रणधीर सावरकर यांनी संबंधित विभागांना दिल्या. १ कोटी ४१ लाख रुपये निधीतून गांधीग्राम येथील महाकाल मंदिरापर्यंत जाणारा रस्ता व घाटाचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे. राजराजेश्‍वर मंदिराच्या कावड-पालखी सोहळ्याला ७७ पेक्षा जास्त वर्षांची परंपरा आहे. गांधी ग्राम येथील पूर्णा नदीतील जल घेऊन शिवभक्त ते राजराजेश्वराला अर्पण करतात. शिवभक्त खांद्यावर कावड घेत रात्रभर पायी चालत येतात. दरम्यान सोमवारी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाहणी झाली. “गत १० वर्षांपासून शिवभक्तांच्या सोयीसाठी प्रयत्न सुरु आहेत. पालखी सोहळा संपल्यानंतर गणेशोत्सव सुरू होत आहे. त्यामुळे विसर्जन मार्ग, शहरातील गणेश मंडळांपर्यंत जाणारे रस्ते, वीज, पाणी आणि आरोग्य सुविधा वेळेत पूर्ण व्हाव्यात, असे आ. सावरकर यांनी सरकारी यंत्रणांना सांगितले. यावेळी महापौर शारदा खेडकर, उपमहापौर अमोल गोगे, स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल, भाजप जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, महानगराध्यक्ष जयंत मसने, नगरसेवक, पवन महाले, गिरीश जोशी, डॉ. शंकरराव वाकोडे, योगेश गोतमारे, माधव मानकर, अंबादास उमाळे, संजय कोरडे, प्रवीण हगवणे, गणेश लोड, , राजेश नागमते, दिलीप नायसे आदी हाते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *