![]()
दरमहा सुमारे 1 लाख 5 हजार वेतन घेणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याला केवळ 4 हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडल्याने नांदेड जिल्ह्यातील आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. धर्माबाद तालुक्यातील करखेली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सोमेश नागोराव मोरे (वय 35) यांच्याविरुद्ध ही कारवाई सोमवारी (3 ऑगस्ट) दुपारी करण्यात आली. तक्रारदार हे करखेली प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या वार्षिक कार्यमूल्यांकन (एपीआर) अहवालावर अनुकूल अभिप्राय नोंदवून स्वाक्षरी करून तो जिल्हा हिवताप अधिकारी, नांदेड यांच्याकडे पाठविण्यासाठी डॉ. मोरे यांनी 4 हजारांची लाच मागितल्याचा आरोप होता. या आरोपाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोमेश मोरे यांनी लाच मागितल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर सावळा रचण्यात आला. या सापळ्यात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोरे यांनी चार हजार रुपये स्वीकारताना रंग हात पकडण्यात आले आहे.
Source link
दरमहा लाखावर पगार, तरीही चार हजारांसाठी लाचखोरी!:वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात, धर्माबाद तालुक्यातील प्रकार