![]()
संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी परतीच्या सोहळ्यानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात 8 आणि 9 ऑगस्ट रोजी वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. पालखी मार्गावर भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने वाहतूक सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने ही अधिसूचना जारी केली आहे. 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2 ते रात्री 8 या वेळेत आळंदीकडे जाणाऱ्या विविध प्रमुख मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध राहणार आहेत. पुणे-आळंदी मार्ग, मोशी-आळंदी मार्ग, मरकळ चौक मार्ग तसेच चाकण-आळंदी मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. या मार्गावरील वाहतूक बंद असणार 9 ऑगस्ट रोजी सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत पालखी मार्गावरील विविध चौकांमध्ये टप्प्याटप्प्याने वाहतूक वळविण्यात येणार आहे. चाकण चौक, वडगाव चौक, केळगाव चौक तसेच आळंदी परिसरातील महत्त्वाच्या मार्गांवर वाहनांना प्रवेशबंदी राहील. याशिवाय जड व अवजड वाहनांनाही काही मार्गांवर प्रवेश दिला जाणार नाही. पिंपरी, भोसरी आणि निगडी वाहतूक विभागाच्या हद्दीतील अनेक प्रमुख चौक, सेवा रस्ते आणि पालखी मार्गावरही वेळेनुसार वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनचालकांनी पोलीस प्रशासनाने सुचविलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा तसेच शक्यतो पालखी मार्गावरील प्रवास टाळावा, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे. भाविकांची सुरक्षितता आणि शहरातील वाहतूक व्यवस्थापन लक्षात घेऊन ही अधिसूचना लागू करण्यात आली असून नागरिकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Source link
पालखी परतीचा सोहळा:पिंपरी-चिंचवडमध्ये 8 व 9 ऑगस्टला वाहतूक बदल; 'हे' आहेत बंद व पर्यायी मार्ग