![]()
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रसेकडून करण्यातआलेली गुंगी गुडीया ही टिका निषेधार्ह असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले. जे दिल्ली येथील आंदोलनाबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्या म्हणाल्या, की जेन झी सकारात्मक आहे. त्यांची वाटचाल योग्य दिशेने सुरु आहे. दिल्लीच्या आंदोलनात काही अपप्रवृत्ती शिरल्या होत्या. मला राजकारणात काही रस नाही. मात्र, लोकांसाठी काम करत राहणार त्यांनी सांगितले. आष्टी येथे आयोजित महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनासाठी बुधवारी त्या आल्या होत्या. यावेळी माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार कणखर आहेत. त्या पाठीमागे उभ्या होत्या म्हणून अजितदादा चांगले काम करु शकले. त्यांच्या पश्चातही सुनेत्राताईंनी धिरोदात्त भूमीका घेतली आहे. त्यांच्यावरील टीका निंदनीय आहे. पुरोगामी महाराष्ट्राला हे न शोभणारे आहे. संजय राऊत यांच्याबाबत बोलण्याची गरज नाही. त्यांच्या टिकेला प्रत्युत्तर देण्यापेक्षा गप्प राहिलेलं चांगलं. कोणत्याही मुद्यावर मत मांडताना आधी अभ्यास करावा, असे त्या म्हणाल्या. आंदोलनाचा डेकोरम दिल्लीत पाळला नाही
Source link
अमृता फडणवीस म्हणाल्या मला राजकारणात रस नाही:आष्टीत आयोजित महाआरोग्य शिबिराला उपस्थिती