Headlines

शिवरस्त्यातील अडथळा दूर; वयोवृद्ध शेतकऱ्याच्या उपोषणाला मिळाले यश, प्रशासन नमले, शिवरस्ता खुला करून मजबुतीकरणाच्या कामाला सुरुवात‎



शिवरस्ता तातडीने खुला करून देण्याची मागणीसाठी राळेगणसिद्धी येथील शेतकरी भाऊ भागचंद गाजरे यांनी पारनेर तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर सुरू केलेले उपोषण बुधवारी (५ ऑगस्ट) मागे घेतले. गाजरे यांच्या एकाकी लढ्याला पाचव्या दिवशी यश आले. शासनाच्या मात

.

दरम्यान, गाजरे यांनी उपोषण सुरू केल्यानंतर दुसऱ्या दिवशी (२ ऑगस्ट) नायब तहसीलदार कारखिले यांनी गाजरे यांची भेट घेऊन सदर रस्ता खुला आहे. मात्र पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी सदर रस्त्याचे मजबुतीकरणाचे काम सध्या सुरू असल्याची भूमिका घेत गाजरे यांना उपोषणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. तशा आशयाचे तहसीलदार गायत्री सौंदाणे यांचे पत्र गाजरे यांना देण्यात आले. मात्र गाजरे बधले नाहीत. रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम अडवण्यात आल्याचे त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. कामातील अडथळा दूर झाल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. अखेर बुधवारी सकाळी मजबुतीकरणाच्या कामातील अडथळा दूर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.काम सुरू झाल्याची खात्री पटल्यावर गाजरे यांनी उपोषण सोडले.गाजरे म्हणाले, मातोश्री ग्राम समृद्ध योजनेतून राळेगणसिद्धी ते नारायणगव्हाण हा रस्ता मंजूर झाला आहे. मात्र भूमिअभिलेख कार्यालयाकडून रस्त्याचे मोजमाप व हद्द निश्चिती झाली नसल्याने काही व्यक्ती हा रस्ता वारंवार अडवतात. त्यामुळे आपण रस्त्याची हद्द निश्चिती करावी यासाठी पारनेर तहसीलदारांकडे सातत्याने पाठपुरावा केला. मात्र दाद मिळाली नाही. त्यामुळे उपोषण करावे लागले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *