![]()
अमरावती ‘दिव्य मराठी’च्या ‘एक वृक्ष-एक जीवन’ अभियानादरम्यान महावितरणच्या जनुना येथील कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण केले. महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता दीपक देवहाते आणि कार्यकारी अभियंता प्रदीप अंधारे यांच्या हस्ते या वेळी २० झाडांचे रोपण केले. उपस्थितांनी या उपक्रमात उत्साहात सहभाग नोंदवला. या वेळी मान्यवर म्हणाले, वृक्ष हे सर्वार्थाने प्रेरणादायी आहेत. ते धीरोदात्तपणे उभे राहतात. त्यांचा हा गुण सर्वांसाठी अनुकरणीय आहे. मनोगत व्यक्त झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते विविध प्रकारची रोपे लावून त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प केला. वृक्ष लागवडीचे महत्त्व, पर्यावरणाचे संतुलन राखण्यात त्यांची भूमिका, भविष्यातील पिढ्यांसाठी हरित पर्यावरण निर्माण करण्याची गरज याविषयीचे मार्गदर्शनही या वेळी केले. शिवाय ‘दिव्य मराठी’च्या देशव्यापी हरितीकरण अभियानाचीही माहिती देण्यात आली. दरम्यान सर्वांनी स्वत:हून पुढे येत एकेका झाडाच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली. एवढेच नव्हे तर पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने आपल्या परिसरात अधिकाधिक वृक्ष लावून त्यांचे जतन करण्याचा संकल्प केला. या उपक्रमामुळे उपस्थितांमध्ये निसर्गप्रेम, सामाजिक जबाबदारी आणि पर्यावरणाबद्दलची संवेदनशीलता अधिक दृढ झाली. यावेळी महावितरणच्या बडनेरा विभागाचे उपकार्यकारी अभियंता जयंत घाटे, सुदाम पाकधाने, वरिष्ठ यंत्रचालक संजय कांबळे, यंत्रचालक महेश जाधव व रोशन डकरे, कमलेश शृंगारे, शरद तंवर, ऋतिक वानखडे, इतर कर्मचारी शिंदे, पाटील आदी उपस्थित होते. वृक्षारोपणास उपस्थित मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता दीपक देवहाते, प्रदीप अंधारे व इतर.
Source link
जनुना येथील महावितरण कार्यालयात वृक्षारोपण:‘दिव्य मराठी’चे ‘एक वृक्ष-एक जीवन’ अभियान; विविध बहुपयोगी वृक्षांचे रोपण