![]()
शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या सुनावणीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. “ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात अतिशय धारदार युक्तिवाद केल्याने शिंदे गटात चलबिचल सुरू झाली आहे. आता त्यांच्यासमोर स्वतःचा गट भाजपमध्ये किंवा प्रहारसारख्या छोट्या पक्षात विलीन करण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही,” असे सूचक विधान राऊत यांनी केले आहे. याचवेळी त्यांनी झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनावरून राहुल गांधींवर टीका करणाऱ्या भाजपलाही उत्तर दिले आहे. ‘आमदार फुटले म्हणजे पक्ष फुटला नाही’ माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, “शिवसेना हा पक्ष अजिबात फुटलेला नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील केवळ विधिमंडळ पक्षात काही आमिषे आणि लोभापोटी फूट पडली. त्यामुळे मूळ पक्ष आणि चिन्ह हे शिवसेनेकडेच राहायला हवे, ही ठाम भूमिका कपिल सिब्बल यांनी खंडपीठासमोर मांडली. एका चिन्हावर निवडून आलेले लोक जर कोणतेही कायदेशीर बंधन न पाळता सत्तेत घुसत असतील, तर संविधानाला काही अर्थ उरणार नाही. न्यायालयाने याबाबतचे सर्व प्रश्न विचारले असून आमच्या वकिलांनी त्यांचे योग्य निरसन केले आहे.”
‘महाशक्ती’चा उल्लेख आणि सुरत-गुवाहाटीचा प्रवास योगायोग नाही राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या जुन्या विधानांची आठवण करून दिली. “वारंवार एकनाथ शिंदे सांगत होते की आमच्या मागे ‘महाशक्ती’ आहे, आमचे कुणी काही करू शकणार नाही. हे सर्व न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहे. एकाच वेळी सर्व आमदारांचे सुरतला जाणे, तिथून गुवाहाटीला आणि मग गोव्याला जाणे, हा कोणताही योगायोग नव्हता, हे कपिल सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे,” असे राऊत म्हणाले. शिंदे गटाला भाजपमध्ये विलीन होण्याशिवाय पर्याय नाही? संजय राऊत यांनी दावा केला की, “मला मिळालेल्या माहितीनुसार, समोरच्या पक्षात आता मोठी चलबिचल सुरू झाली आहे. आता त्यांचा गट भाजपमध्ये किंवा त्यांच्यासोबत असलेल्या प्रहारसारख्या लहान पक्षात विलीन करण्याबाबत त्यांच्यात खल सुरू आहे. लवकरच फुटीर गटाचे नेते दिल्लीत येऊन अमित शहा यांच्याशी चर्चा करतील. ज्यांनी घटनेशी द्रोह आणि बेईमानी केली, त्यांना आम्ही कायद्याच्या माध्यमातूनच संपवू. निवडणूक आयोगाचा दबावाखाली दिलेला चुकीचा निर्णय जर सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला, तर तो लोकशाहीचा मोठा विजय असेल.” संजय राऊत यांनी आज केलेले ट्विट.. झारखंडमधील विद्यार्थी आंदोलन आणि राहुल गांधी दुसरीकडे, झारखंडमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी गप्प का आहेत, असा सवाल भाजपने उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना राऊत म्हणाले, “राहुल गांधी गप्प आहेत, असे मला अजिबात वाटत नाही. युवा, विद्यार्थी आणि जनतेच्या प्रश्नांवर राहुल गांधी कधीही गप्प बसले नाहीत, हे मी मान्यच करणार नाही. मात्र, झारखंडमध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील सरकार आहे. त्यामुळे या प्रकरणात सर्वांत पहिली आणि मोठी जबाबदारी ही तिथल्या मुख्यमंत्र्यांची आहे,” असे स्पष्ट करत राऊत यांनी आपली भूमिका मांडली. हेही वाचा.. जंतर-मंतर आंदोलनानंतर CJPची आज निर्णायक बैठक: पुढील रणनीती, संघटन विस्तार, देशव्यापी आंदोलनाच्या आराखड्यावर मंथन: दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद जंतर-मंतर आंदोलनानंतर आता कॉक्रोच जनता पार्टी पुढील राजकीय आणि संघटनात्मक दिशा निश्चित करण्याच्या तयारीत आहे. छत्रपती संभाजीनगर येथे आज दुसऱ्या दिवशीही पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक होत असून, देशभरातील आंदोलनांची रणनीती, संघटन विस्तार आणि विविध राष्ट्रीय प्रश्नांवर पुढील भूमिका याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर येथे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या उपस्थितीत पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक आज दुसऱ्या दिवशीही सुरू असणार आहे. जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर संघटनेची पुढील दिशा काय असावी, देशभरात संघटन कसे वाढवायचे, तसेच विविध राज्यांमध्ये जनआंदोलने उभारण्यासाठी कोणती रणनीती आखायची, यावर बैठकीत सविस्तर चर्चा होत असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. सविस्तर वाचा
Source link
बेईमानी करणाऱ्यांना कायद्यानेच संपवू:संजय राऊतांचा शिंदेंना इशारा, भाजप किंवा प्रहारमध्ये विलीन होण्याशिवाय त्यांना पर्याय नसल्याचा दावा