Headlines

सर्व विद्यार्थ्यांनी आत्मपरीक्षण करत स्वत: मध्ये सुधारणा करण्याची गरज:तहसीलदार महेश सावंत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; नवागतांचे केले स्वागत‎




अहिल्यानगरसह शेजारील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योगधंद्यांची उभारणी होत असल्याने येणारा काळ नवोदित अभियंत्यांसाठी रोजगाराच्या दृष्टीने अत्यंत आशादायी ठरणार आहे. मात्र विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना अपयशासाठी इतरांना जबाबदार न धरता आत्मपरीक्षण करून स्वतःमध्ये सुधारणा करण्यावर भर द्यावा, असे प्रतिपादन तहसीलदार महेश सावंत यांनी केले. संजीवनी पॉलीटेक्नकच्या प्रथम व थेट द्वीतिय वर्षाच्या नवागतांचे स्वागत ‘संजीवनी तंत्रआरंभ’ या कार्यक्रमाने झाला. या कार्यक्रमात सावंत यांनी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट अमित कोल्हे यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुषवले. यावेळी सर्कल ऑफिसर मच्छिंद्र पोकळे, प्राचार्य ए. आर. मिरीकर उपस्थित होते. प्राचार्य मिरीकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. सावंत म्हणाले, पुढील तीन-चार वर्षे ही शिक्षण संस्था तुमच्या आयुष्याला नवी दिशा देणारी नवसंजीवनी आणि उर्जा देणारी ठरणार आहे. ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांनी कोणताही न्यूनगंड बाळगू नये. संसाधने कमी असली तरी जिद्द, सातत्य आणि मेहनतीच्या जोरावर मोठे यश मिळविता येते. कोल्हे म्हणाले, तुमची खरी स्पर्धा इतरांशी नसून स्वतःशी आहे. त्यामुळे दररोज स्वतःला अधिक सक्षम बनवा. प्राध्यापक सांगतील ती प्रत्येक गोष्ट गांभीर्याने करा. असामान्य व्यक्ती वेगळे काही करत नाही तर प्रत्येक काम उत्कृष्टतेने आणि सातत्याने करते. म्हणून कौशल्य, सातत्य आणि जिज्ञासू वृत्ती जोपासा. संजीवनीमध्ये केवळ शैक्षणिक गुणवत्तेलाच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासालाही प्राधान्य दिले जाते. विविध उपक्रमांमध्ये सहभाग घ्या. संजीवनीचे ३३ हजारांहून अधिक माजी विद्यार्थी ही संस्थेची मोठी ताकद आहे. अनेक माजी विद्यार्थी नामांकित संस्थांमध्ये उच्च पदांवर कार्यरत असून अनेक यशस्वी उद्योजक आहेत. त्यांच्याशी संपर्क ठेवा, त्यांच्याकडून प्रेरणा घ्या आणि उद्योगक्षेत्रासाठी स्वतःला तयार करा. केवळ पदवी मिळवणे नव्हे तर कौशल्य, नवोपक्रम, संशोधन आणि सामाजिक जबाबदारी यांचा समन्वय साधून विकसित भारताचे सक्षम शिल्पकार बनण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. प्रा. आय. के. सय्यद यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. एस. एम. सोनवणे यांनी आभार मानले. कौशल्य अन् जिज्ञासू वृत्ती जोपासा : कोल्हे कोल्हे म्हणाले, विद्यार्थ्यांची खरी स्पर्धा इतरांशी नसून स्वतःशी आहे. त्यामुळे दररोज स्वतःला अधिक सक्षम बनवा. प्राध्यापक सांगतील ती प्रत्येक गोष्ट गांभीर्याने करा. असामान्य व्यक्ती वेगळे काही करत नाही तर प्रत्येक काम उत्कृष्टतेने आणि सातत्याने करते. म्हणून कौशल्य, सातत्य आणि जिज्ञासू वृत्ती जोपासा.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *