![]()
शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि नावाबाबत सर्वोच्च न्यायालयात बुधवारी आणि गुरुवारी सलग दोन दिवस महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली, ज्यामध्ये ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. सर्वोच्च न्यायालयातील या घडामोडींवर आणि ठाकरे गटाच्या युक्तिवादावर आता प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ आणि ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. असीम सरोदे म्हणाले, धनुष्यबाण चिन्हावर सुनावणी झाली आहे. राजकीय पक्ष श्रेष्ठ आहे, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. तीन न्यायाधीशांनी स्पष्ट केले की राजकीय पक्षाला डावलले जाऊ शकत नाही. निवडून आलेल्या सदस्यांना मत मांडण्यासाठी संधी असावी. उद्धव ठाकरे यांच्याकडून आक्षेप आहे की पक्ष आणि चिन्ह याबबतीत मर्यादा ओलंडली आहे. भारतीय जनता पक्षाच्या सांगण्यानुसार ही बाब झालीये असे माझे मत आहे. बहुमताच्या जीवावर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला सूट देण्यात आली हे चूक आहे. राज्यपाल यांनी दिलेला निर्णय चुकीचा आहे, असे मत सरोदे यांनी व्यक्त केले आहे. पुढे बोलताना असीम सरोदे म्हणाले, पुढच्या सुनावणीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला बाजू मांडण्याची संधी मिळेल, मात्र आम्हाला देखील मत मांडण्यासाठी संधी मिळेल. आम्हाला अपेक्षा आहे की आमच्या बाजूने निर्णय लागेल, लोकशाही संविधानिक मार्गाने टिकण्यासाठी निर्णय लागणे गरजेचे आहे. राजकीय आणि विधिमंडळ ही बाब वेगळी आहे. राजकीय पक्षाला डावलून विधिमंडळ पक्षाला महत्त्व देता येणार नाही, कारण राजकीय पक्ष हा कायमस्वरूपी असतो. तर विधिमंडळ पक्ष हा पाच वर्षासाठी असतो. चिन्ह आणि पक्ष यांचा निर्णय एक वर्षात लागू शकतो. मुळात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने सिब्बल हे युक्तिवाद करत आहेत. त्यांचा युक्तिवाद ताकदीचा आहे. सत्य कायमच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाबरोबर राहील. राजकीय पक्षावर वर्चस्व कोणाचे आहे हे महत्त्वाचे ठरते. केवळ निवडून आलेल्या आमदारांना पक्ष बहाल करण हे बरोबर नाही, असेही असीम सरोदे यांनी म्हटले आहे.
Source link
केवळ आमदारांच्या बहुमतावर पक्ष बहाल करणे चुकीचे:सत्य ठाकरेंसोबतच राहील, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर असीम सरोदेंची प्रतिक्रिया