Headlines

विंद्याचल द स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी उपक्रमांमधून जपले निसर्गभान:कागदी पिशव्यांचे वाटप, सीड बॉल निर्मिती, कचऱ्यातून बनवल्या कलाकृती‎



मुलांमध्ये लहानपणापासूनच पर्यावरणाविषयी जागरुकता व जबाबदारीची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने येथील विंद्याचल द स्कूलमध्ये पर्यावरण सप्ताह राबवण्यात आला. शाळेतील सर्व इयत्तामधील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात भाग घेतला.

.

प्राथमिक विभागातील चिमुकल्यांना पर्यावरण संवर्धन समजून सांगण्यासाठी अनेक प्रकारचे मनोरंजक उपक्रम घेण्यात आले. यात ‘स्विच-ऑफ अवर’- ऊर्जेच्या बचतीचा संदेश देण्यासाठी शाळेत एक तास सर्व दिवे, अनावश्यक विजेची उपकरणे बंद ठेवण्यात आली. ‘हरित प्रतिज्ञा’- सकाळच्या प्रार्थना सभेत सर्व मुलांनी निसर्गावर प्रेम करण्याची आणि त्याचे रक्षण करण्याची शपथ घेतली. ‘कागदी पिशव्यांची निर्मिती आणि वाटप’- मुलांनी जुन्या वर्तमानपत्रांपासून कागदाच्या पिशव्या बनवल्या व प्लास्टिकचा वापर न करण्याचा संदेश देत त्यांचे वाटप केले. ‘सीड बॉल मेकिंग’- माती, खत व बियांच्या मदतीने मुलांनी इको-फ्रेंडली ‘सीड बॉल’ बनवायला शिकले, जेणेकरून ते नवीन रोपे लावू शकतील. ‘कविता वाचन व कथाकथन’- वर्गात मुलांनी पर्यावरणावर आधारित सुंदर कविता व गोष्टी सांगून निसर्गाप्रती आपले प्रेम व्यक्त केले. ‘कचऱ्यातून समृद्धी (कचऱ्यापासून खजिना)’- घरातील सुका कचरा आणि निरुपयोगी वस्तूंपासून मुलांनी सुंदर कलाकृती बनवून ‘थ्री आर’चे (रिड्यूस, रियूज, रिसायकल) महत्त्व समजून घेतले.

शाळेतील उर्वरित सर्व वर्गांच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक ज्ञानवर्धक आणि सर्जनशील उपक्रम घेण्यात आले. यात ‘टायनी डिटेक्टिव्ह्ज ऑन अ मिशन’ आणि ‘रिसोर्स डिटेक्टिव्ह्ज’, ‘ग्रीन प्लेज वॉल’ आणि ‘पोस्टर मेकिंग स्पर्धा’, “बाघ/ बगीचा विरुद्ध पार्किंग लॉट’ आणि इतर विषयांवर अंतर-वर्ग वादविवाद स्पर्धा. ‘वक्तृत्व स्पर्धा’ आणि ‘निबंध लेखन’, विशेष व्याख्यान आणि पर्यावरणावर आधारित ‘मूव्ही शोकेस’, ‘वृक्षारोपण मोहीम’, ‘वेस्ट टू वेल्थ’, ‘कपड्यांच्या कार्बन फूटप्रिंटवर सेमिनार’, ‘फॅन्सी ड्रेस’ आणि ‘ग्रीन डे सेलिब्रेशन’ आदी उपक्रमांचा यात समावेश होता. शाळेतील सर्व शिक्षकांनी मुलांना प्रेरित करण्यासाठी आणि प्रत्येक उपक्रम योग्य रीतीने पूर्ण करून घेण्यासाठी परिश्रम घेतले.

पास्टिकमुक्तीचा संदेश ऊर्जेच्या बचतीचा संदेश देण्यासाठी शाळेत ‘स्विच-ऑफ अवर’ अंतर्गत एक तास सर्व दिवे व विजेची उपकरणे बंद ठेवण्यात आली. जुन्या वर्तमानपत्रांपासून कागदी पिशव्या बनवून प्लास्टिकमुक्तीचा संदेश दिला; तसेच माती आणि खताच्या मदतीने इको-फ्रेंडली ‘सीड बॉल’ तयार केले. घरातील सुक्या कचऱ्यापासून कलाकृती बनवून “रिड्यूस, रियूज, रिसायकल’चे महत्त्व मांडले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *