Headlines

शहरातील नागरिकांना मूलभूत दर्जेदार सुविधा देण्याची मागणी:न. प. मुख्याधिकाऱ्यांना सामाजिक कार्यकर्ते शेख आमीन शेख यांचे निवेदन‎




शहरातील नागरिकांना नियमित व दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते शेख आमीन शेख हुसेन यांनी नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले. या निवेदनात शहरातील अनेक भागात नियमितपणे स्वच्छता मोहीम राबवणे, शहरात वेळेवर, पुरेसा स्वच्छ पाणीपुरवठा करणे, रस्त्यावरील बंद दिवे तत्काळ सुरू करावे, रस्त्यांवरील खड्ड्यांची दुरुस्ती करणे, इतर नागरी मूलभूत सुविधा प्रभावीपणे सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, शहर स्वच्छ, सुरक्षित व सुविधायुक्त राहावे, शहरातील अनेक भागात नियमितपणे स्वच्छता मोहीम राबवणे, शहरात वेळेवर, पुरेसा स्वच्छ पाणीपुरवठा करणे, रस्त्यावरील बंद दिवे तत्काळ सुरू करावे, , यासाठी नगर परिषद प्रशासनाने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी विनंतीही सामाजिक कार्यकर्ते शेख आमीन शेख हुसेन यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी उपमुख्याधिकारी आनंद देवकते यांनी निवेदन स्वीकारून शहरातील नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने संबंधित विभागांना आवश्यक सूचना देऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांच्यावतीने आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *