Headlines

मी कुणाला भेटायचं हे मीच ठरवणार:अभिजीत दिपकेंनी PSI ला घराबाहेर काढले; अमेरिकन AI कंपनीकडून विनापरवानगी माहिती वापरल्याचा दिपकेंकडून आरोप




छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिजित दिपके यांच्या निवासस्थानी भेटीसाठी येणाऱ्या नागरिकांना पोलिस उद्धट वागणूक देत असल्याचा आरोप करत त्यांनी एका पीएसआयला जाब विचारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. “मला कोणाला भेटायचं हे पोलिस ठरवणार नाहीत, तो निर्णय मी घेईन,” असे दिपके यांनी सांगितले. या घटनेनंतर पोलीस आणि दिपके यांच्यातील संवादाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. “मी कुणाला भेटायचं, हे पोलीस ठरवणार नाहीत!” सोशल मीडियावर अभिजीत दिपके यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते एका पोलीस उपनिरीक्षकाला (PSI) थेट घराबाहेर हाकलून लावताना दिसत आहेत. आपल्याला भेटण्यासाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांना पोलीस अत्यंत उद्धट वागणूक देत असल्याचा आरोप दिपके यांनी केला आहे. पोलिसांच्या या दंडेलशाहीवर संताप व्यक्त करत, “मी कुणाला भेटायचं, हे पोलिसांनी मला सांगायची गरज नाही. मी कुणाला भेटणार हे केवळ मीच ठरवणार,” असे आक्रमक शब्दांत सुनावत त्यांनी त्या पोलीस अधिकाऱ्याला तिथून जाण्यास सांगितले. अमेरिकन AI कंपनीकडून माहितीचा वापर दुसरीकडे, अमेरिकेतील एका AI स्टार्टअपने फ्युचरक्राईम समिट 2026 मध्ये आपल्या AI टूलमध्ये स्वतःची माहिती वापरल्याचा आरोप करत अभिजित दिपके यांनी सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. “माझी माहिती वापरण्याची परवानगी कोणी दिली?” असा सवाल त्यांनी सोशल मीडियावर केला. याचवेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टच्या भाषणात जनरेशन Z आणि तरुणांच्या प्रश्नांवर भाष्य करावे, अशी मागणीही केली. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथील CJPच्या बैठकीत देशभरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मोहीम राबवण्याचा, शिक्षण शुल्काच्या प्रश्नावर आंदोलन छेडण्याचा आणि १२ सदस्यीय कार्यकारिणी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहितीही दिपके यांनी दिली. हेही वाचा.. ED, CBI सगळे तुमच्याकडे तरी 30 वर्षांच्या तरुणाची धास्ती का?:शिरसाटांच्या भेटीवरून अभिजीत दिपकेंचा भाजपला टोला, दिल्लीतील तक्रारीवरही भाष्य सीजेपी पक्षाचे संस्थापक आणि विद्यार्थी आंदोलनाचा चेहरा बनलेले अभिजीत दिपके यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर आणि त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर सविस्तर भाष्य केले आहे. शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांच्यासोबत झालेल्या भेटीवरून निर्माण झालेल्या राजकीय चर्चांवर त्यांनी मोठा खुलासा केला आहे. तसेच, भाजपने एका ३० वर्षांच्या मुलाची एवढी भीती बाळगण्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *