![]()
नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने नुकत्याच स्थापन झालेल्या जलदगती न्यायालयात अंतिम आरोपपत्र दाखल केले. त्यात एकूण १३ प्रमुख आरोपींची नावे आहेत. त्यापैकी ९ जण महाराष्ट्राचे आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे (एनटीए) विषयतज्ज्ञ पी. व्ही. कुलकर्णी (लातूर), मनीषा मांढरे, मनीषा हवालदार (पुणे) हेच पेपरफुटीचे मुख्य सूत्रधार असल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. त्यांनी एनटीएच्या गोपनीय विभागात सीसीटीव्ही आणि तपासणी होत नसल्याचा फायदा घेत दिल्लीतील गोपनीय विभागातून प्रश्न चोरले आणि मध्यस्थांच्या साखळीमार्फत राजस्थान व हरियाणामधील उमेदवारांना १० ते १२ लाख रुपयांना विकले. महाराष्ट्रात आरसीसी कोचिंग क्लासचा संचालक शिवराज मोटेगावकरने पेपर खरेदी केली. महाराष्ट्रातील इतर आरोपींची नावे अशी. डॉ. मनोज शिरूरे (लातूर), मनीषा वाघमारे, धनंजय लोखंडे, तेजस शाह (सर्व पुणे), शुभम खैरनार (नाशिक). कसा चोरला पेपर : सीबीआयच्या आरोपपत्रानुसार, एनटीएच्या गोपनीय विभागात कुलकर्णी, हवालदार, मांढरेंना प्रश्नाच्या भाषांतरासाठी रफ कामासाठी कोरे कागद दिले जायचे. कुलकर्णीने छोट्या चिठ्ठ्यांवर रसायनशास्त्राचे सर्व १३५ प्रश्न व त्यांचे पर्याय लिहून ते लपवून बाहेर आणले. सोपे प्रश्न त्याने पाठ केले आणि हॉटेलवर जाऊन लिहून काढले. राज्यातील नव्या राजकीय समीकरणांविषयीही चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे. मोदींनी खासदारांना सांगितले की, सत्तेचा वापर मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न आणि विकासकामे वेगाने मार्गी लावण्यासाठीच करा. केंद्र सरकारशी संबंधित पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांत अडचणी आल्यास थेट पंतप्रधान कार्यालयाशी (पीएमओ) समन्वय साधा. केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मिडीयावर सक्रिय व्हा. दरम्यान, भेटीनंतर शिंदे म्हणाले की, विरोधक संसदेत लोकशाही मार्गाने चर्चेऐवजी राजकीय स्टंटबाजी करत आहेत. दुसरीकडे मोदी स्वतः युवा वर्गाशी (जेन्-झी ) थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत.
Source link
नीट पेपरफुटीमध्ये एकूण 13 आरोपी, त्यातील 9 महाराष्ट्राचे:विशेष न्यायालयात सीबीआयचे आरोपपत्र दाखल, प्रत्येक विद्यार्थ्याला 10 ते 12 लाख रुपयांना प्रश्न विकले