![]()
दोन महिन्यांपूर्वी २५५ किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करून २५ हजार रुपयांचा दंड ठोठावलेल्या जुना मोढा येथील नवकार बेकरीवर महानगरपालिकेने शुक्रवारी (७ऑगस्ट) पुन्हा धडक कारवाई केली.या वेळी २५ किलो प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा जप्त करून पुन्हा२५ हजार रुपयांचा दंड आकारण्यातआला. एकाच व्यापाऱ्याकडून वारंवारनियमभंग होत असल्याने दंडाची भीतीउरली आहे का, असा प्रश्न उपस्थितझाला आहे. महानगरपालिकेच्या घनकचराव्यवस्थापन विभागाच्या पथकाने जुनामोढा येथील नवकार बेकरीवर छापाटाकला. तपासणीत २५ किलोप्रतिबंधित प्लास्टिकचा साठा आढळूनआला. तो जागेवरच जप्त करूननिकामी करण्यात आला. तसेचव्यापाऱ्यावर २५ हजार रुपयांचा दंडआकारण्यात आला. विशेष म्हणजे,एप्रिल महिन्यात याच बेकरीवरकारवाई करून २५५ किलो प्रतिबंधितप्लास्टिक जप्त करण्यात आले होते.त्या वेळीही २५ हजार रुपयांचा दंडठोठावण्यात आला होता. मनपानेसमज दिल्यानंतरही पुन्हा नियमभंगझाल्याने या कारवाईला विशेष महत्त्वप्राप्त झाले आहे. मनपा आयुक्तअमोल येडगे यांच्या आदेशानुसारआणि घनकचरा व्यवस्थापनविभागाचे उपायुक्त नंदकिशोर भोंबेयांच्या देखरेखीखाली ही कारवाई पारपडली. शहरात गस्त घालत असताना”नागरिक मित्र पथका”तील देविदाससुसर व बालाजी साबळे यांनामिळालेल्या माहितीच्या आधारे झोनक्र. ०२ मधील जुना मोढा भागात हीधडक कारवाई करण्यात आली. कारवाईची भीती उरली नाही का? देशभरात १ जुलै २०२२ पासून ”सिंगल यूझप्लास्टिक”वर बंदी लागू आहे. महाराष्ट्रात प्रतिबंधितप्लास्टिकचा वापर, साठा आणि विक्री दंडनीय आहे.तरीही कारवाईनंतरही त्याच दुकानात पुन्हा प्लास्टिकसापडत असेल, तर केवळ किरकोळ व्यापाऱ्यांवरकारवाई करून प्रश्न सुटणार का? की प्लास्टिकच्याउत्पादन आणि घाऊक पुरवठा साखळीवरहीकारवाईची गरज आहे, हा प्रश्न या घटनेने पुन्हाऐरणीवर आणला आहे.
Source link
कारवाईची भीती उरली नाही का?:दोन महिन्यांपूर्वी 255 किलो प्लास्टिक जप्त केलेल्या बेकरीत 25 किलो कॅरीबॅग सापडल्या