Headlines

Rupali Thombre Alleges Sunil Tatkare, Prafull Patel In NCP Controversy


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या मोठा अंतर्गत राजकीय भूकंप होण्याची चिन्हे दिसत आहेत. प्रसिद्ध राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन पक्ष संघटना मजबूत करण्या

.

15 नोव्हेंबरला अजितदादांनी स्पष्ट सांगितले होते…

आपल्या दाव्याची पार्श्वभूमी स्पष्ट करताना रूपाली ठोंबरे म्हणाल्या, “15 नोव्हेंबर रोजी आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या निमित्ताने आमची अजितदादांसोबत बैठक झाली होती. त्यावेळी दादांनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते की, ‘मी लवकरच प्रदेशाध्यक्ष बदलणार आहे, तुम्ही सर्वजण कामाला लागा. आपल्याला पुणे मनपा निवडणूक पूर्ण ताकदीने लढायची आणि जिंकायची आहे.’ ही केवळ माझ्याशीच नाही, तर अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी दादांची झालेली चर्चा होती. पक्षातील ज्येष्ठ नेते आणि मंत्र्यांनाही ही वस्तुस्थिती पूर्णपणे माहीत आहे, पण ते आता उघडपणे बोलण्याचे धाडस दाखवत नाहीत.”

त्या पुढे म्हणाल्या की, सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष पदावर काम करताना आता 2 ते 3 वर्षे झाली आहेत. त्यामुळे पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी नव्या आणि तरुण चेहऱ्यांना संधी मिळणे आवश्यक आहे.

दादा असतानाही पत्रांसाठी दिरंगाई केली जायची

सुनील तटकरे यांच्यावर गंभीर नाराजी व्यक्त करताना ठोंबरे म्हणाल्या, “अजितदादा हयात असतानाही प्रदेशाध्यक्ष म्हणून तटकरे कसे वागायचे, याचे उदाहरण मी स्वतः अनुभवले आहे. जेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजितदादा एखाद्या निष्ठावंत कार्यकर्त्याच्या नियुक्तीचा निर्णय घ्यायचे आणि निवडीचे पत्र देण्याचे आदेश द्यायचे, तेव्हा प्रदेशाध्यक्षांच्या कार्यालयाकडून ते पत्र देण्यात प्रचंड दिरंगाई केली जायची. अनेकदा दादांचे कार्यकर्ते असूनही त्यांना जाणीवपूर्वक डावलले जायचे. आमचा तटकरेंशी वैयक्तिक कोणताही वाद नाही, पण जर पक्षाचे संघटन वाढवायचे असेल, तर त्यांनी स्वतःहून प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन पद रिक्त करावे.”

पवार कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न? पटेल आणि तटकरेंवर निशाणा

पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केलेल्या सोशल मीडिया पोस्टचे समर्थन करत रुपाली ठोंबरे यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर अत्यंत बोचरे आरोप केले.

“अजितदादांच्या दुर्दैवी निधनानंतर या जुन्या आणि वरिष्ठ नेत्यांनी पवार कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवे होते. सुनेत्रा वहिनी, पार्थ आणि जय पवार यांना ताकद, बळ आणि विश्वास देणे गरजेचे होते. मात्र, हे नेते बंधू म्हणून पाठीशी उभे राहताना दिसले नाहीत.”

“अजितदादा गेल्यानंतर पक्षात स्वतःचे स्थान बळकट करण्यासाठी किंवा पक्ष ताब्यात घेण्यासाठीच पवार कुटुंबाला असा त्रास दिला जातोय का? असा सवाल आता निर्माण होतो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तमाम कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आता सुनेत्रा वहिनींचे नेतृत्व मान्य केले आहे. त्यामुळे कोणीही पक्षावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करू नये.”

प्रशांत किशोर यांच्या सल्ल्याला कार्यकर्त्यांचा पाठिंबा

रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी ‘प्रदेशाध्यक्ष बदलल्याशिवाय काम करणार नाही’ अशी भूमिका घेतल्याचे समोर आल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडल्याची चर्चा आहे. मात्र, रूपाली ठोंबरे यांनी प्रशांत किशोर यांच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. पक्षवाढीसाठी संघटनात्मक फेरबदल अत्यंत आवश्यक असून, अंतिम निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार सुनेत्रा पवार यांचाच आहे, असेही त्यांनी नमूद केले. रूपाली ठोंबरे यांच्या या थेट आणि आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस आता उघड झाली असून, आगामी काळात सुनेत्रा पवार प्रदेशाध्यक्षपदाबाबत काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा…

सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात?:उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना प्रशांत किशोर यांचा थेट अल्टीमेटम, राष्ट्रवादीत नव्या चर्चांना उधाण

अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) धुरा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आली आहे. आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षात मोठ्या संघटनात्मक बदलांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी नुकतीच मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.