Headlines

मागण्या कायद्याच्या चौकटीत मांडा:मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री मराठा समाजासाठी जीव ओतून काम करतायत – सुधीर मुनगंटीवार




भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेत राज्यातील आणि देशातील विविध राजकीय घडामोडींवर सविस्तर भाष्य केले. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नियुक्तीवरील चर्चेवर भूमिका स्पष्ट केली. “राहुल गांधींना सत्तेत जाण्याची घाई झाली आहे,” असा टोला लगावतानाच त्यांनी मनोज जरांगे पाटील यांनाही संयम बाळगण्याचा आणि कायद्याच्या चौकटीत राहून मागण्या मांडण्याचा सल्ला दिला आहे. “शिव्या देऊन प्रश्न सुटत नसतात” मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार टीका केली होती. तसेच, ‘जर कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप पुन्हा सुरू केले नाही, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे राजकारण उद्ध्वस्त करू,’ असा इशारा जरांगेंनी दिला होता. या आव्हानावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले, “कोणतीही मागणी ही कायद्याच्या चौकटीत राहूनच मांडावी लागते. अपशब्द वापरून किंवा शिव्या देऊन कधीही प्रश्न सुटू शकत नाही. राज्यात याआधीही मराठा समाजाने आंदोलने केली आहेत, तेव्हा सर्वच मराठा नेते कायदेशीर आणि योग्य हक्कांसाठी शांततेच्या मार्गाने आग्रही असायचे, आणि ते पुढेही राहतील.” “मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री समाजासाठी जीव ओतून काम करतायत” राज्य सरकार मराठा समाजाच्या पाठीशी उभे असल्याचे सांगत मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले, “मुख्यमंत्री आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यातील दोघे तर स्वतः मराठाच आहेत. हे सर्व नेते मराठा समाजाच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी खरोखर जीव ओतून काम करत आहेत. आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे यांसारख्या नेत्यांसोबत काम करताना मी त्यांचा मराठा समाजाप्रती असलेला दृष्टिकोन अनुभवला आहे. समाजाच्या प्रगतीसोबतच राज्याची प्रगती आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सर्व जण मन लावून काम करतील, यात कोणतेही दुमत नाही.” प्रशांत किशोर यांच्या नियुक्तीवर भाजप नाराज नाही! निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सल्लागारपदी नियुक्ती झाल्याने भाजप नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. यावर स्पष्टीकरण देताना मुनगंटीवार म्हणाले, “या नियुक्तीमुळे भाजप अजिबात नाराज नाही. एखाद्या राजकीय पक्षाने दुसऱ्या राजकीय तज्ज्ञाचा सल्ला घेण्यात काहीही आक्षेपार्ह नाही. शेवटी सल्ला घेताना आपण त्याची गुणवत्ता पाहूनच घेतो. प्रोफेशन आणि राजकारण या दोन्ही गोष्टी वेगळ्या ठेवल्या पाहिजेत. म्हणूनच मला वाटतं की भाजपचे मन खूप मोठे आहे.” इथेनॉलच्या मुद्द्यावर सावध भूमिका दरम्यान, इथेनॉलच्या धोरणाबाबत विचारलेल्या प्रश्नावरही त्यांनी मत व्यक्त केले. “इथेनॉलच्या मुद्द्यावर अधिक वैज्ञानिक संशोधनाची गरज आहे. जर राजकीय नेतेच स्वतःला संशोधक समजू लागले, तर भविष्यात मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात,” असे सूचक विधान मुनगंटीवार यांनी केले. हेही वाचा.. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर:शहा, फडणवीस-शिंदेंची सह्याद्रीवर महत्त्वाची बैठक; राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले असून, सध्या त्यांची एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महत्त्वाची बैठक सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्याचा दौरा केल्यानंतर आता शहा मुंबईत दाखल झाल्याने या दौऱ्याला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. या दौऱ्यात ते दोन प्रमुख शासकीय कार्यक्रमांना हजेरी लावणार असून, भाजपच्या स्थानिक नेत्यांसोबत राजकीय आढावा बैठकही घेणार आहेत. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *