Headlines

नाशिक-पुणे रेल्वे मार्गावरून सिन्नरमध्ये चक्काजाम:सत्यजित तांबे पोलिसांच्या ताब्यात, म्हणाले- हे सर्वसामान्यांचे जनआंदोलन




नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या प्रस्तावित मार्गातील बदलाच्या विरोधात आज सिन्नरसह नाशिक, संगमनेर आणि अकोले परिसरात आंदोलन केले जात आहे. समृद्धी महामार्गावर जाणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी सिन्नरमध्ये रोखले. यावेळी आमदार सत्यजीत तांबे यांच्यासह काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांचे काम केले, आम्ही आमचे काम करू – सत्यजित तांबे पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर प्रतिक्रिया देताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले, “पोलिसांनी त्यांचे काम केले आहे, पण आम्ही आमचे काम करतच राहणार आहोत. हे सर्वसामान्यांचे जनआंदोलन आहे आणि ते आता थांबणार नाही. जोपर्यंत नाशिक-पुणे रेल्वे पूर्वी ठरलेल्या सरळ मार्गाने जात नाही, तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहील.” याचसोबत त्यांनी सर्व आंदोलकांना शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू ठेवण्याचे आवाहनही केले. काय आहे संपूर्ण प्रकरण? सुमारे १६ हजार कोटी रुपये खर्चाच्या या नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेचा पुणे–चाकण–राजगुरुनगर–मंचर–नारायणगाव–आळेफाटा–संगमनेर–सिन्नर–नाशिक असा मूळ मार्ग निश्चित करण्यात आला होता. मात्र, नारायणगाव येथील जागतिक दर्जाच्या रेडिओ दुर्बिणीच्या सुरक्षेचे कारण देत रेल्वे मंत्रालयाने हा मार्ग बदलून अहिल्यानगर-चाकण किंवा नाशिक-शिर्डी असा पर्यायी मार्ग शोधण्यास सुरुवात केली आहे. महामार्गावर वाहतूक ठप्प या मार्ग बदलाला विरोध करण्यासाठी आज माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार राजाभाऊ वाजे आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. सिन्नर, संगमनेर आणि चाकण भागात एकाच वेळी आंदोलन झाल्यामुळे नाशिक-पुणे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. दरम्यान, या प्रकल्पाचा तांत्रिक अभ्यास करण्यासाठी डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली असून, ती दोन महिन्यांत आपला अहवाल सादर करणार आहे. मात्र, “आम्हाला मूळ मार्गच हवा,” या मागणीवर आंदोलक ठाम आहेत. हेही वाचा.. संविधान आणि सुप्रीम कोर्ट पंतप्रधान मोदींपेक्षा मोठे:मूळ पक्ष उद्धव ठाकरेंचाच, आम्हाला नक्की न्याय मिळेल- संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिंदे गटाच्या खासदारांना दिलेल्या भेटीवरून आणि देशातील सद्यस्थितीवरून शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. “पंतप्रधान मोदी संसदेत येत नाहीत, मात्र त्यांनी गद्दारांसाठी दिल्लीत कॅटरिंग उघडली आहे, असा घणाघात राऊत यांनी केला. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांच्या पंतप्रधानांकडील भेटीच्या वेळेबाबतही त्यांनी मोठा खुलासा केला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *