Headlines

पंढरपूरहून पैठणला परतीच्या वारीचे आगमन:संत एकनाथ महाराज पालखीची चांदीच्या रथातून मिरवणूक‎




पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे रविवारी आगमन झाले. यावेळी पाच हजार भाविकांच्या उपस्थितीत चांदीच्या रथातून मिरवणूक काढण्यात आली. नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी, ज्ञानेश महाराज गोसावी, योगेश महाराज गोसावी, रवींद्र महाराज पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली पालखीने परतीच्या प्रवासास सुरुवात केली होती. स्वागतावेळी नगराध्यक्षा विद्या कावसानकर, तुषार पाटील, जितूभाऊ परदेशी, गंगाराम महाराज राऊत, रखमाजी महाराज नवले, बबन महाराज बोरकर, भुषण कावसानकर, बजरंग लिंबोरे, पवन लोहिया आदी उपस्थित होते. मिरवणूक श्री संत एकनाथ महाराज समाधी मंदिरात पोहोचल्यानंतर वारकरी व भाविकांच्या उपस्थितीत महाआरती व धार्मिक विधी पार पडले. त्यानंतर नाथांच्या पादुका मंदिरातील देवघरात विधिवत पूजन करून विराजमान करण्यात आल्या. पादुकांचे दर्शन घेण्यासाठी पैठण शहरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. समाधी मंदिरातील देवघरात पादुका विराजमान



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *